आपला जिल्हा

“जिल्ह्याच्या भूमिपुत्रांनी क्रीडा क्षेत्रात मिळविलेले यश हे त्यांची जिद्द आणि मेहनतीचे प्रतीक” — ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

“जिल्ह्याच्या भूमिपुत्रांनी क्रीडा क्षेत्रात मिळविलेले यश हे त्यांची जिद्द आणि मेहनतीचे प्रतीक” — ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

“जिल्ह्याच्या भूमिपुत्रांनी क्रीडा क्षेत्रात मिळविलेले यश हे त्यांची जिद्द आणि मेहनतीचे प्रतीक” — ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

Loni vijay kapse दि २६ सप्टेंबर २०२६– जिल्ह्याच्या भूमिपुत्रांनी क्रीडा क्षेत्रात राज्य आणि देशपातळीवर मिळविलेले यश हे जिद्द आणि मेहनतीचे आहे. त्यांच्या अनुभवाने जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा नवा अध्याय आपल्याला सुरू करायचा आहे. लोणी येथे भव्य क्रीडा अकादमीची स्थापना करून सर्व खेळाडूंना जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणाची सुविधा निर्माण करून देणार,” अशी ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

जाहिरात

अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने पद्मश्री डॉ. विखे पाटील यांचे स्मृतीचिन्ह देऊन ‘क्रीडारत्न’ पुरस्काराने या सर्व खेळाडूंना आणि त्यांच्या पालकांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी डॉ. विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, संस्थेचे संचालक आप्पासाहेब दिघे, गणपतराव शिंदे, भारत घोगरे, पोपटराव वाणी, अशोक गागरे यांच्यासह पुरस्कारप्राप्त खेळाडू कोमल वाकळे, गणेश पवार, फिजा सय्यद, शार्दुल गागरे, डॉ. प्रफुल्ल सोमण आदी उपस्थित होते.

जाहिरात

आपल्या भाषणात मंत्री ना. विखे पाटील यांनी पुरस्कारप्राप्त सर्व खेळाडूंचा गौरवपूर्ण उल्लेख करून सांगितले की, “तुम्हा सर्वांच्या कष्टामुळेच क्रीडा क्षेत्रामध्ये जिल्ह्याचा नावलौकिक राज्य आणि देशपातळीवर होऊ शकला. जिल्ह्याला ही नवी ओळख तुम्ही निर्माण करून दिली आहे. तुमच्या या यशामध्ये पालक आणि प्रशिक्षकांचे खूप मोठे योगदान असून, तुमच्या अनुभवामुळेच नव्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे.”

जाहिरात

“जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राची वाटचाल आपल्या सर्वांच्या अनुभवातून पुढे घेऊन जायची आहे,” असे स्पष्ट करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, “सर्वच क्षेत्रांतील खेळाडूंना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून लोणी येथे जिल्ह्याची क्रीडा अकादमी स्थापन करण्यात येणार असून, या माध्यमातून खेळाडूंना अद्ययावत सुविधा दिल्या जातील. पुरस्कारप्राप्त खेळाडूंना यामध्ये सल्लागार म्हणून नेमून, त्यांच्या अनुभव आणि सूचनांमधूनच जिल्ह्याच्या क्रीडा विकासाचा एक नवा अध्याय सुरू केला जाईल.”

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या १७५ विद्यार्थ्यांनी देश आणि राज्य पातळीवर मिळविलेल्या यशामुळे हा ‘क्रीडारत्न’ सन्मान सोहळा प्रवरेच्या भूमीत आयोजित केला गेला. ज्या भूमीने सहकार आणि धवलक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली, तसेच राष्ट्रीय आरोग्य मिशन अभियानाचा शुभारंभही याच भूमीतून झाल्यामुळे प्रवरेची ही भूमी नेहमीच भविष्याचा वेध घेऊन काम करते. तुम्हा खेळाडूंसाठीसुद्धा प्रवरेची ही भूमी नवी दिशा देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. या प्रसंगी जिल्ह्यातील एकूण ७३८ खेळाडूंना ‘क्रीडारत्न’ पुरस्कार देऊन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले.

जाहिरात

पुरस्कारप्राप्त खेळाडू फिजा सय्यद हिने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने क्रीडारत्न पुरस्कार देऊन आम्हांला मोठे पाठबळ दिले आहे. यामुळे आमची जिद्द आणि चिकाटी निश्चितच वाढणार असून, आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळेच आदिवासी भागातील माझ्यासारखी मुलगी भारताचे प्रतिनिधित्व करू शकली.” आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर शार्दुल गागरे याने आपल्या भाषणात, “मंत्री ना. विखे पाटील यांनी माझ्या बुद्धिबळाच्या खेळासाठी लहानपणापासून खूप मदत केली, त्यामुळेच मी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचू शकलो,” अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. खेळाडू कोमल वाकळे हिने, “पालकमंत्री ना. विखे पाटील आमच्यासारख्या खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, याची जाणीव करून देणारा हा ऐतिहासिक पुरस्कार सोहळा आहे,” असे सांगितले. या सोहळ्यास जिल्ह्यातील विविध संस्थांमधील खेळाडू, पालक आणि क्रीडा प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे