आपला जिल्हा

ज्ञानाची शिदोरीच आयुष्याची खरी कमाई; विद्यार्थ्यांनी ज्ञानवंत व्हावे-आ. आशुतोष काळे

ज्ञानाची शिदोरीच आयुष्याची खरी कमाई; विद्यार्थ्यांनी ज्ञानवंत व्हावे-आ. आशुतोष काळे

तिडके पाटील विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २७ सप्टेंबर २०२६: आजचे युग हे स्पर्धा, तंत्रज्ञान आणि माहितीचे आहे. या काळात केवळ परीक्षेतील गुणांपेक्षा विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य आणि विचारशक्ती आत्मसात करणे अधिक महत्त्वाचे आहे. पैसा, संपत्ती आणि भौतिक साधने काळानुसार कमी-जास्त होऊ शकतात; मात्र ज्ञानाची शिदोरी ही आयुष्यभर साथ देणारी आणि कधीही चोरीला न जाणारी संपत्ती आहे. ज्ञानामुळे व्यक्तीला आत्मविश्वास आणि जीवनातील आव्हानांवर मात करण्याचे सामर्थ्य मिळते. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या शिक्षणाच्या संधीचे सोने करून विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांचे ज्ञान आत्मसात करावे आणि या ज्ञानाच्या बळावर आपले भविष्य घडवावे असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील रयत शिक्षण संस्थेच्या मारुतीराव दगडूजी तिडके पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

जाहिरात

ते पुढे म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. ‘कमवा व शिका’ योजनेतून अनेक विद्यार्थ्यांनी स्वावलंबीपणे शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थ्यांनी या विचारांचा आदर्श घेऊन मन लावून अभ्यास करावा, तसेच शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रातही प्रगती करावी.क्रीडा, कला, विज्ञान आदी क्षेत्रांतही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवावा, असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मा.खा.स्व.कर्मवीर शंकररावजी काळे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वाढीसाठी मोलाचे योगदान दिले. त्यांचा हा वारसा माजी आमदार अशोकराव काळे यांनी अविरतपणे पुढे नेला.पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजीतदादा पवार यांच्या आशीर्वादाने मला देखील उतर विभागाची जबाबदारी मिळाली. ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून रयत शिक्षण संस्था आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले.काळे परिवाराची रयत शिक्षण संस्थेशी असलेला ऋणानुबंध आणि बांधिलकी यापुढेही कायम ठेवत रयत शिक्षण संस्थेच्या शाळा महाविद्यालयाच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात

याप्रसंगी मायभूमी सोशल फाउंडेशन, आधार फाउंडेशन व कृष्णा चांदगुडे यांच्या वतीने गुणवंत, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. तसेच उद्योजक विनोदजी आहिरे यांनी शाळेसाठी २१ हजार रुपयाच्या खुर्च्या भेट दिल्या. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचे वाटप करण्यात आले. तसेच रांगोळी प्रदर्शन व ए.आय. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी भास्करराव चांदगुडे, सोमनाथ घुमरे, सुभाषराव गाडे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन दिनार कुदळे, संचालक डॉ. मच्छिंद्र बर्डे, सचिन चांदगुडे, रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग सल्लागार मंडळाचे सदस्य सोमनाथ चांदगुडे, जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे, गौतम बँकेचे संचालक श्रीकांत तिरसे, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दौलतrराव मोरे,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष कृष्णा चांदगुडे, सुनिल आहिरे, विठ्ठलराव जामदार, सुनिल गाडे, पुरुषोत्तम गाडे, ज्ञानेश्वर चांदगुडे, अशोकराव माळी, हरिभाऊ चांदगुडे, किरण चांदगुडे, कैलास माळी, बापूसाहेब कासोदे, डॉ.संतोष पऱ्हे, अनिल चांदगुडे, बाळासाहेब पायमोडे, सरपंच नानासाहेब बनसोडे, उपसरपंच विनायक गाडे, पोलीस पाटील प्रकाश शिंदे, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य महेश गाडे, आण्णासाहेब चांदगुडे, प्राचार्य एस.यु. दवंगे, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने  उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व स्वागत पर्यवेक्षक पी.ए.निळकंठ यांनी केले.सूत्रसंचालन आर.के. मोरे व डी.एन. कुशारे यांनी केले तर आभार एन.आर.कदम यांनी मानले.

                              

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे