आपला जिल्हा

आत्मा मालिक गुरुकुलच्या १८ लॉन टेनिस खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

आत्मा मालिक गुरुकुलच्या १८ लॉन टेनिस खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

आत्मा मालिक गुरुकुलच्या १८ खेळाडूंची विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

Kopargaon vijay kapse दि २७ सप्टेंबर २०२६– अहिल्यानगर  येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धेत आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत स्पर्धा गाजविली. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुरुकुलच्या तब्बल १८ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जाहिरात

क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

प्राचार्य निरंजन डांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षे मुली गटातून आदिती घोरपडे, ज्ञानेश्वरी काळे, विज्ञानी कुंभार, श्रेया ढोकळे व आर्या वाघमोडे, १७ वर्षे मुले गटातून हर्षद कडूस, पृथ्वीराज खोले, सोहम भगत, साईराज देवकाते व देव गायकवाड यांची निवड झाली आहे.

जाहिरात

तसेच १९ वर्षे मुली गटातून आरती तुरे, राशी सरोवर, शर्वरी आगरी, तनुष्का कोरडे व मनाली पवार, तर १९ वर्षे मुले गटातून रुद्राक्ष बोरसे, आदित्य पराठे, श्रेयस देशमुख व प्रज्वल गिरी यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक रविंद्र नेद्रे तसेच प्रशिक्षक अभिषेक कुमावत यांचे मार्गदर्शन लाभले.

खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, साईनाथ वर्पे, मीरा पटेल यांनी अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि मार्गदर्शनाचा परिणाम

“विद्यार्थ्यांची मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे आत्मा मालिक गुरुकुलच्या १८ विद्यार्थ्यांची विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आगामी स्पर्धेतही या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करावी, यासाठी त्यांना संस्थेच्या वतीने सर्वतोपरी प्रोत्साहन दिले जाईल.”

नंदकुमार सूर्यवंशी, अध्यक्ष, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट :

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे