आपला जिल्हा

आ.सत्यजित तांबे यांच्याकडून संगमनेर एमआयडीसी साठी पाठपुरावा; पठार भागात एमआयडीसीसाठी सर्वेक्षण लवकरात लवकर करा – आमदार तांबे

आ.सत्यजित तांबे यांच्याकडून संगमनेर एमआयडीसी साठी पाठपुरावा; पठार भागात एमआयडीसीसाठी सर्वेक्षण लवकरात लवकर करा – आमदार तांबे

मुंबई येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न

Sangmner vijay kapse दि ३० सप्टेंबर २०२६- लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण विकास, दूध व्यवसाय, सहकार आणि शिक्षण आणि सततची विकास कामे या माध्यमातून राज्यासाठी मार्गदर्शक ठरलेल्या संगमनेर तालुक्यात नव्याने एमआयडीसीच्या माध्यमातून अधिक रोजगार उपलब्ध निर्मितीसाठी आमदार सत्यजित तांबे यांनी उद्योग मंत्री व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला असून साकुर पठार भागातील एमआयडीसीसह सहकारी एमआयडीसीच्या विविध प्रश्नांबाबत त्यांनी चर्चा केली. तसेच लवकरात लवकर सर्वेक्षण पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा अशी मागणी त्यांनी केली.

जाहिरात

मुंबई येथे एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी देपेंद्रसिंह कुशावह व अहिल्यानगर येथील एमआयडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी साकुर पठार भागामध्ये एमआयडीसी साठी लवकरात लवकर सर्वेक्षण व्हावे पाणीपुरवठ्याचे नियोजन व्हावे याबाबत चर्चा केली.

जाहिरात

संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून भौगोलिक दृष्ट्या पठार भाग, प्रवरा पट्टा व तळेगाव भाग अशी तीन विभाग पडतात. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श विचारांवर संगमनेर तालुक्याचे वाटचाल सुरू असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण विकास, दूध व्यवसाय, शिक्षण, सहकार या माध्यमातून तालुक्यात आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे. शांतता, सुव्यवस्था ही संगमनेर तालुक्याचे वैशिष्ट्य असून माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण, नाशिक पुणे हायवे, शहरासाठी थेट पाईपलाईन योजना, विविध वैभवशाली इमारती, प्रत्येक गावामध्ये विकासाच्या योजना, नद्या ओढे यांच्यावर सिमेंट बांधारांचे जाळे निर्माण करून तालुक्याची प्रगती साधली.

जाहिरात

याचबरोबर सहकारी एमआयडीसीमध्ये सुमारे 180 विविध व्यवसाय असून त्या माध्यमातून 5000 नागरिकांना रोजगार मिळाला आहे. तालुक्यात नव्याने शासकीय एमआयडीसी व्हावी याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

आमदार सत्यजित तांबे यांनी मुंबई येथे एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंद्रसिंह कुशावह व अहिल्यानगर जिल्ह्यातील एमआयडीसी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन साकुर, बोटा, पठारभाग परिसरामध्ये लवकरात लवकर सर्वेक्षण पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी याबाबतच्या सूचना केली अशी मागणी ही केली.

तसेच संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहती मधील विविध प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी उद्योग विभागाने तातडीने मदत करावी अशी मागणी ही आमदार सत्यजित तांबे यांनी केली असून या बैठकीच्या माध्यमातून एमआयडीसीच्या कामाला गती मिळेल व सहकारी औद्योगिक वसाहत मधील प्रश्न सोडवण्यासाठी ही उद्योग विभाग मदत करेल असे आश्वासित करण्यात आले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे