आपला जिल्हा

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षा उत्साहात संपन्न

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षा उत्साहात संपन्न

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षा उत्साहात संपन्न

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १५ ऑक्टोबर २०२६ : महात्मा गांधीजींचे जीवनकार्य, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि समाजपरिवर्तनाचा संदेश विद्यार्थ्यांना समजावा, तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, बंधुभाव, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजावी, या उद्देशाने एस.एस.जी.एम. महाविद्यालयात गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने ‘गांधी विचार संस्कार परीक्षा’ घेण्यात आली. या परीक्षेत महाविद्यालयातील १२५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

जाहिरात

महात्मा गांधीजींचे सत्य, अहिंसा, शांती, स्वावलंबन आणि नैतिक मूल्यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, हा या परीक्षेचा प्रमुख उद्देश होता. परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गांधीजींच्या प्रेरणादायी जीवनप्रसंगांची तसेच त्यांच्या विचारांची ओळख झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व नैतिक मूल्यांची जाणीव अधिक दृढ होण्यास मदत झाली.

जाहिरात

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी परीक्षास्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विचार संस्कार परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी प्र. उपप्राचार्य रवींद्र हिंगे, पर्यवेक्षक  माधव रेवगडे आणि परीक्षा समन्वयक  ज्ञानेश्वर झांबरे यांच्यासह शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे