आपला जिल्हा

एस.एस.जी.एम.चा क्रिकेट संघ जिल्हास्तरीय स्पर्धेचा उपविजेता   

एस.एस.जी.एम.चा क्रिकेट संघ जिल्हास्तरीय स्पर्धेचा उपविजेता  

एस.एस.जी.एम.चा क्रिकेट संघ जिल्हास्तरीय स्पर्धेचा उपविजेता   

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १५ ऑक्टोबर २०२६– अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित १९ वर्षाखालील जिल्हास्तरीय शालेय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा १४  ऑक्टोंबर  रोजी आत्मा मालिकच्या मैदानावर संपन्न झाल्या, सदर स्पर्धेसाठी जिल्ह्यातील १४ तालुके सहभागी झाले होते.

जाहिरात

या स्पर्धेत एस.एस.जी.एम कॉलेजच्या संघाने पहिल्या सामन्यात जिवाजीराव महाविद्यालय, दुसऱ्या सामन्यात राहुरी तर उपांत्यपूर्व सामन्यात श्रीरामपूर संघाला पराभूत करत अंतिम फेरी गाठली.  अतिम सामना एस.एस.जी.एम कोपरगाव व त्रिमूर्ती कॉलेज नेवासा असा झाला. अंतिम सामन्यात एस.एस.जी.एम संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ५ षटकात ३१ धावांचे लक्ष ठेवले. लक्षाचा पाठलाग करताना नेवासा संघाने नाबाद ३३ धावा करत जिल्हास्तरीय स्पर्धेचे विजेतेपद पटकविले. तर एस.एस.जी.एम कोपरगाव संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

जाहिरात

       उपविजेत्या संघातील प्रतिक फुलारे, राम खोमणे या खेळाडूंच्या चमकदार कामगिरीने या दोन खेळाडूंची विभाग स्तरावरील निवड चाचणीसाठी निवड करण्यात आली. सदर स्पर्धेप्रसंगी अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे व जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे  अजय कविटकर उपस्थित होते. स्पर्धेतील उपविजेत्या संघातील खेळाडूंचे महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन तथा रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कॉन्सिल सदस्य अॅड. संदीप वर्पे, प्राचार्य डॉ. माधव सरोदे, प्र. उपप्राचार्य  रविंद्र हिंगे व पर्यवेक्षक  माधव रेवगडे यांनी कौतुक व अभिनंदन  करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संघाला मार्गदर्शन संदीप शिंदे,  सुनील कदम यांनी सहकार्य केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे