आपला जिल्हा

दुष्काळामुळे महिला बचत गट संकटात, मायक्रो फायनान्स कंपन्यांनी वसुली थांबवावी : मा.आ.स्नेहलता कोल्हे 

दुष्काळामुळे महिला बचत गट संकटात, मायक्रो फायनान्स कंपन्यांनी वसुली थांबवावी : मा.आ.स्नेहलता कोल्हे
महिला बचत गटांना सहकार्य करा : कोल्हे
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १६ ऑक्टोबर २०२६–कोपरगाव मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीमुळे महिलांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.रोजगाराअभावी कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले असतानाही खासगी मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कर्मचारी माहिला बचत गटाच्या महिलांच्या घरी जाऊन तसेच त्यांच्या कुटुंबीयांकडे कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तगादा लावत असल्याच्या तक्रारी महिलांनी समक्ष भेटून मांडलेल्या असून त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत महिलांकडून होणारी कर्जवसुली तातडीने थांबवावी यासाठी कठोर नियमावली करावी अशी मागणी मा.आ.स्नेहलता कोल्हे यांनी शासनाकडे केली आहे. महिला बचत गट दुष्काळात संकटात असल्याने सदरची वसुली होऊ न देता सहकार्य करावे अशी विनंती शासनाकडे केली आहे.

जाहिरात
कोपरगाव तालुक्यासह विधानसभा मतदारसंघातील बचत गटाच्या महिलांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची भेट घेऊन खासगी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होत असलेल्या पठाणी वसुलीबाबत तक्रारी मांडल्या. कर्जाचे हप्ते थकल्यानंतर कंपन्यांचे कर्मचारी महिलांच्या घरी जाऊन वसुलीसाठी दबाव आणत असल्याने महिलांसह त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे या महिलांनी सांगितले. या तक्रारींची दखल घेत स्नेहलताताई कोल्हे यांनी सदर प्रकरण वरिष्ठ स्तरावर कळविले आहे.

जाहिरात
ग्रामीण भागातील अनेक महिला कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी खासगी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून उच्च व्याजदराने कर्ज घेतात.कर्ज घेताना महिलांकडून आधारकार्ड, पॅनकार्ड यांसह आवश्यक कागदपत्रे घेतली जातात. यापैकी बऱ्याच मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून १८ ते २४ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक व्याज आकारले जात असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत.

जाहिरात
दुष्काळापूर्वी महिला नियमितपणे कर्जाचे हप्ते भरत होत्या. मात्र, सध्याच्या परिस्थितीत रोजगार उपलब्ध नसल्याने उत्पन्नाचे साधन कमी झाले आहे. घरखर्च भागविणे आणि कर्जाचे हप्ते भरणे कठीण बनले आहे. अशा परिस्थितीत खाजगी मायक्रो फायनान्स कर्मचारी वसुलीसाठी महिलांच्या घरी जाऊन तसेच कुटुंबीयांकडे तगादा लावून दबाव आणला जात असल्याने महिलांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून खासगी मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी कर्जवसुलीसाठी कोणत्याही महिलेच्या घरी जाऊ नये. संबंधित कंपन्यांच्या वसुली पद्धतींची चौकशी करून नियमबाह्य वसुली करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि अडचणीत सापडलेल्या महिलांना दिलासा द्यावा, अशी मागणी मा.आ.स्नेहलता कोल्हे यांनी शासनाकडे वरिष्ठस्तरावर केली आहे.

मा.आ.स्नेहलता कोल्हे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे