आपला जिल्हा

नवरात्रोत्सव मांगल्याचे प्रतीक — काकासाहेब कोयटे

नवरात्रोत्सव मांगल्याचे प्रतीक — काकासाहेब कोयटे
ओमनगर येथील गल्ली क्रमांक ४ मध्ये आदिशक्ती महिला मंडळाच्या आरती प्रसंगीं बोलत होते
Kopargaon vijay kapse दि १६ ऑक्टोबर २०२६: हिंदू धर्मामध्ये विविध सण-उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामध्ये नवरात्रोत्सव हा श्रद्धा, भक्ती, शक्ती आणि मांगल्याचे प्रतीक मानला जातो. नवरात्रीच्या काळात आदिशक्तीची मनोभावे उपासना केली जाते. हा उत्सव समाजामध्ये सकारात्मक ऊर्जा, एकोपा आणि भक्तीची भावना निर्माण करणारा असल्याचे प्रतिपादन समता पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी केले.

जाहिरात

शहरातील ओमनगर येथील गल्ली क्रमांक ४ मध्ये आदिशक्ती महिला मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त देवीची मनोभावे स्थापना करण्यात आली आहे. या देवीची आरती नुकतीच समता पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब कोयटे, माजी नगराध्यक्ष सुहासिनी कोयटे, सामाजिक कार्यकर्ते संदीप कपिले तसेच त्यांच्या पत्नी व नगरसेविका सोनाली कपिले यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.

जाहिरात

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना काकासाहेब कोयटे म्हणाले की, नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो स्त्रीशक्तीचा आणि आदिशक्तीच्या सामर्थ्याचा जागर करणारा उत्सव आहे. नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची आराधना करताना समाजात सद्भावना, एकोपा आणि संस्कारांची भावना अधिक दृढ होते. त्यामुळे प्रत्येकाने नवरात्रोत्सव भक्तिभावाने आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

जाहिरात

या प्रसंगी ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे, आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा भावना पवार यांच्यासह मोनिका देवकर, रोहिणी महाजन, श्वेता सोनवणे, जयश्री सोळसे, सुचित्रा साबळे, जयश्री महाजन, पल्लवी सोनवणे, रंजना सपकाळ, रेखा देवकर, पूजा ठेंगडे, सारिका बारहाते, पूजा जाधव, यशोदा महाजन, सरोज यादव, निलेश देवकर, उमेश महाजन, योगेश सोनवणे, सुनील सोळसे, अरविंद सपकाळ, चेतन बारहाते, पंकज जाधव, सुशांत साबळे, सुखदेव कुराडे, अमोल महाजन, कांतीलाल देवकर, महेश सोनवणे, राजेंद्र नानकर आदींसह परिसरातील महिला, भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे