आपला जिल्हा

डॉ.जयश्री थोरात यांच्या संकल्पनेमुळे १०० महिलांच्या पंखाला बळ; एकविराच्या माध्यमातून टेलरिंग व आरी वर्क प्रशिक्षण

डॉ.जयश्री थोरात यांच्या संकल्पनेमुळे १०० महिलांच्या पंखाला बळ; एकविराच्या माध्यमातून टेलरिंग व आरी वर्क प्रशिक्षण
डॉ.जयश्री थोरात यांच्या संकल्पनेमुळे १०० महिलांच्या पंखाला बळ; एकविराच्या माध्यमातून टेलरिंग व आरी वर्क प्रशिक्षण
Sangmner vijay kapse दि १६ ऑक्टोबर २०२६– महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून महिलांना गृहउद्योग व व्यवसायासाठी व्यासपीठ मिळावे याकरता 75 महिलांना टेलरिंग व 25 आरी वर्क प्रशिक्षण देण्यात आल्या असून या माध्यमातून या महिलांना स्वयंरोजगाराच्या साठी बळ मिळाले आहे.

जाहिरात
यशोधन कार्यालय येथे टेलरिंग व आरी वर्क प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 100 महिलांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी डॉ.नितीन भांड, रामदास तांबडे, प्रशिक्षक  शिला करंजेकर, दिव्या मयूर काळे, समन्वयक शर्मिला हांडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. डॉ.जयश्री थोरात यांनी एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील महिलांना व युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण मिळावे याकरता टेलरिंग व आरी वर्क चे प्रशिक्षण क्लास यशोधन कार्यालय परिसरात सुरू केले आहे. या क्लास मधून आत्तापर्यंत तालुक्यातील 550 महिलांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून नव्याने 75 महिलांनी टेलरिंग व 25 महिलांनी दीड महिन्यांचे आरिवर्क प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या माध्यमातून रोजगारासाठी त्यांना बळ मिळाले आहे.

जाहिरात

यावेळी बोलताना शीला करंजेकर म्हणाल्या की, महिलांनी कुटुंबाची जबाबदारी कायम सांभाळली आहे. आर्थिक स्रोत निर्माण करण्यासाठी घरगुती व्यवसाय स्वयंरोजगार हा अत्यंत गरजेचा झाला आहे जेणे करून आपण कुटुंबाला हातभार लावू शकतो. याचबरोबर सातत्याने कामात राहिल्याने महिलांचे आरोग्य ही चांगले राहते डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी सुरू केलेल्या या उपक्रमांमधून अनेक महिलांना व्यवसाय व स्वयंरोजगाराची मोठी संधी आणि व्यासपीठ निर्माण झाले असल्याचे त्या म्हणाल्या.डॉ. नितीन भांड म्हणाले की, यशोधन कार्यालय हे जनसेवेच्या विश्वासाचे कार्यालय आहे. नागरिकांच्या विविध प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी यशोधनच्या माध्यमातून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने प्रयत्न होत असून महिलांसाठीही स्वयंरोजगाराची चांगली संधी एकविरा फाउंडेशनने निर्माण करून दिले असल्याचे ते म्हणाले.

जाहिरात

तर शर्मिला हांडे म्हणाल्या की, महिलांच्या स्वयंरोजगार बरोबर डॉक्टर जयश्री थोरात यांनी महिलांच्या आरोग्यासाठी मोठे काम केले आहे. गावोगावी सातत्याने आरोग्य शिबिर होत असून महिलांची तपासणी केली जात आहे. ज्या महिलांमध्ये तपासणी मध्ये काही आढळल्यास एसएमबीटी ट्रस्टच्या माध्यमातून महिलांना आरोग्याबाबतचे मार्गदर्शन व मोफत उपचार केले जातात. महिला सक्षमीकरणाचा हा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरत असून तालुक्यातील महिला व युवतींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी सर्व महिलांना प्रमाणपत्र व आरी वर्क केलेले पिशव्या व साहित्य वाटप करण्यात आले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे