आपला जिल्हा

दिपावलीपूर्वी उर्वरित हायमॅक्स दिवे सुरू करणार – नगराध्यक्ष पराग संधान

दिपावलीपूर्वी उर्वरित हायमॅक्स दिवे सुरू करणार – नगराध्यक्ष पराग संधान

ब्रीजलालनगर, ओमनगर आणि गवारे नगर परिसरात हायमॅक्स दिव्यांचे लोकार्पण; नागरिकांकडून समाधान व्यक्त

Kopargaon vijay kapse १९ ऑक्टोबर २०२६– कोपरगाव शहरातील प्रत्येक प्रभागात नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास नगरपरिषद प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. आमदार विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कामांना गती देण्यात येत असून, नागरिकांच्या अडीअडचणी दूर करण्यावर भर दिला जात आहे. शहरातील उर्वरित हायमॅक्स दिवे दीपावलीपूर्वी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिली.

जाहिरात

कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी प्रभाग क्रमांक १ मधील ब्रीजलालनगर, ओमनगर आणि गवारे नगर परिसरात विविध ठिकाणी बसविण्यात आलेल्या हायमॅक्स दिव्यांचे लोकार्पण नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

जाहिरात

परिसरातील नागरिकांना पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध व्हावी, रात्री उशिरा तसेच अपरात्री ये-जा करणाऱ्या नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि महिला भगिनींच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळावे, या उद्देशाने हायमॅक्स दिवे कार्यान्वित करण्यात आले आहेत. या दिव्यांमुळे परिसरातील रस्ते प्रकाशमान होऊन नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

जाहिरात

विकासाच्या विश्वासनाम्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न

आमदार विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरातील विकासकामांना प्राधान्य देण्यात येत आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करणे आणि विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे, ही नगरपरिषद प्रशासनाची भूमिका आहे. विकासाच्या विश्वासनाम्यात दिलेली आश्वासने प्रत्यक्ष कृतीतून पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, उर्वरित हायमॅक्स दिवेही दीपावलीपूर्वी सुरू करण्यात येतील, असे नगराध्यक्ष पराग संधान यांनी स्पष्ट केले.

नागरिकांकडून समाधान; मान्यवरांचे आभार

प्रभाग क्रमांक १ मधील ब्रीजलालनगर, ओमनगर आणि गवारे नगर परिसरात हायमॅक्स दिवे सुरू झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. परिसरात प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी आमदार विवेक कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान आणि सर्व नगरसेवकांचे आभार मानले.

या प्रसंगी वैभव आढाव, वैभव गिरमे, मनोज शेठ अग्रवाल, दीपक जपे, राहुल खरात, राजेंद्र गायकवाड, निसार शेख, सिद्धेश कपिले, संजय खरोटे, भावसार साहेब, सौ. दीपाताई वैभव गिरमे, सुभान सर, देवा बागुल, सौरभ होते, श्रीकांत पायमोडे, ज्ञानेश्वर शिणगर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे