आपला जिल्हा

राष्ट्रीय स्तरावर संजीवनीच्या शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब; पुढील तीन वर्षांसाठी मानांकन प्राप्त- अमित कोल्हे

राष्ट्रीय स्तरावर संजीवनीच्या शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब; पुढील तीन वर्षांसाठी मानांकन प्राप्त- अमित कोल्हे

राष्ट्रीय स्तरावर संजीवनीच्या शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब; पुढील तीन वर्षांसाठी मानांकन प्राप्त- अमित कोल्हे

Kopargaon vijay kapse दि १८ ऑक्टोबर २०२६ : संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च (डी. फार्मसी) या संस्थेला नवी दिल्ली येथील ‘नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडिटेशन’ (एनबीए) या संस्थेकडून पुढील तीन वर्षांसाठी प्रतिष्ठित मानांकन प्राप्त झाले आहे. या यशामुळे संजीवनीच्या शैक्षणिक गुणवत्तेवर राष्ट्रीय स्तरावर शिक्कामोर्तब झाले असून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, अशी माहिती संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

जाहिरात

एनबीए मानांकनासाठी संस्थेने मागील तीन वर्षांतील शैक्षणिक कामगिरी, विद्यार्थ्यांची प्रवेशसंख्या, उच्चविद्याविभूषित व अनुभवी प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी-शिक्षक प्रमाण, विद्यार्थ्यांचा उत्तीर्णतेचा वाढता आलेख, उच्च शिक्षणासाठी नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी यांसह विविध बाबींचा सविस्तर अहवाल सादर केला होता.

जाहिरात

याशिवाय प्राध्यापकांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतलेले परिसंवाद, सादर केलेले शोधनिबंध, आयोजित कार्यशाळा, संशोधन व कन्सल्टन्सी उपक्रम, विद्यार्थ्यांनी क्रीडा आणि इतर क्षेत्रांत मिळविलेले यश, अत्याधुनिक प्रयोगशाळा, नामांकित कंपन्यांशी केलेले सामंजस्य करार आणि माजी विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमधील प्रगती अशा अनेक निकषांचा पुराव्यांसह आढावा सादर करण्यात आला होता. पालकांचा संस्थेवरील विश्वास आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत कंपन्यांनी दिलेला सकारात्मक अभिप्राय यांचाही त्यात समावेश होता.

जाहिरात

एनबीएच्या कठोर मूल्यांकन प्रक्रियेनुसार राष्ट्रीय समितीने संस्थेने सादर केलेल्या कागदपत्रांची, पुराव्यांची आणि निर्धारित निकषांची प्रत्यक्ष पडताळणी केली. या प्रक्रियेनंतर अवघ्या एका महिन्यात संस्थेला पुढील तीन वर्षांसाठी अधिकृत मानांकन प्रदान करण्यात आले.

राज्यातील मोजक्याच संस्थांमध्ये संजीवनीचा समावेश

महाराष्ट्रात सुमारे ५०० हून अधिक डी. फार्मसी संस्था कार्यरत असताना, त्यापैकी सुमारे २५ संस्थांनाच आजवर एनबीएचे मानांकन प्राप्त झाल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या मोजक्या संस्थांच्या यादीत संजीवनी डी. फार्मसीचा समावेश होणे ही राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण उपलब्धी मानली जात आहे.

संजीवनीचे प्रेसिडेंट तथा मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी संजीवनी डी. फार्मसीला ‘एनबीए’ मानंकन मिळाल्याबध्दल प्राचार्य डाॅ. निलेश पेंडभाजे यांचा सत्कार केला. यावेळी संचालिका डाॅ. मनालीताई कोल्हे व डाॅ. बार. एस.शेंडगे उपस्थित होते

‘आउटकम बेस्ड एज्युकेशन’ या गुणवत्ताकेंद्रित शिक्षणपद्धतीच्या निकषांनुसार संस्थेच्या शैक्षणिक प्रक्रियेचे मूल्यमापन करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व्यावसायिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देताना संजीवनीने गुणवत्तेला प्राधान्य दिले. संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे राष्ट्रीय स्तरावरील कठोर निकषांची पूर्तता करणे शक्य झाले आहे.

संजीवनी परिवाराचे सर्व स्तरांतून अभिनंदन या ऐतिहासिक यशाबद्दल संजीवनी संस्थेचे अध्यक्ष  नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे आणि संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी संस्थेचे हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ. आर. एस. षेंडगे, हेड ऑफ इन्स्टिट्यूट सर्व्हिसेस  प्रकाश जाधव, प्राचार्य डॉ. निलेश पेंडभाजे, प्रा. संतोष रावतोळे, प्रा. अमित नारंग, प्रा. शाहिन पठाण, प्रा. वेदिका कालेवार, प्रा. आदिती काटे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

संजीवनी डी. फार्मसीला मिळालेल्या या मानांकनामुळे कोपरगावसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून संजीवनी परिवारावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे