आपला जिल्हा

शिरसगाव धुपे येथील नागरिक व महिलांनी घेतली लोकनेते बाळासाहेब थोरात यांची भेट

शिरसगाव धुपे येथील नागरिक व महिलांनी घेतली लोकनेते बाळासाहेब थोरात यांची भेट

आम्ही सदैव थोरात साहेब यांच्या सोबत एकनिष्ठ काय काळजी

Sangmner vijay kapse दि २२ ऑक्टोबर २०२६–संगमनेर तालुक्याच्या डोंगरावर अतिदुर्गम भागात असलेले शिरसगाव धुपे या गावातील नागरिकांनी आज लोकनेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन साहेब आम्ही काल आज आणि उद्याही तुमच्या सोबत आहोत असे स्पष्ट करतो.

जाहिरात

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे शिरसगाव धुपे येथील नागरिकांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली .यावेळी मा पंचायत समिती सदस्य गोपीनाथ भोजने, सोमनाथ गोडसे, भिका धराडे, चेअरमन नामदेव धराडे, बाळकृष्ण गांडाळ, सचिन धराडे,ग्रामपंचायत सरपंच मंगेश धराडे , उपसरपंच प्रवीण दिघे, विजय धराडे, अंकुश दिघे,भाऊसाहेब कोरडे, रामनाथ भूतांबरे,अर्जुन धराडे, सुनील धराडे ,नामदेव धराडे ,शंकर धराडे ,एकनाथ धराडे ,रमेश धराडे, सौ सुनंदा रंधे, सौ सोनाबाई धराडे , विनायक भोजने ,गंगाराम चौधरी, चंद्रभान चौधरी, मारुती चौधरी ,तुळशीराम चौधरी, दत्तू भोजने, जनार्दन चौधरी, अजय चौधरी, मोहित चौधरी ,पांडुरंग चौधरी, पुनाजी चौधरी, यशवंत चौधरी, सौ. कांताबाई चौधरी ,द्वारका चौधरी, जनाबाई चौधरी ,अलका लहांगे, शोभा चौधरी, सुमन भोजने, स्वाती भोजने, मंगल धराडे, वंदना चौधरी, संगीता चौधरी ,आशा चौधरी ,सुनिता चौधरी, नारायण कुलाळ ,सोमनाथ चौधरी आदी उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी नागरिकांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर मुक्त संवाद साधला. याप्रसंगी गोपीनाथ भोजने म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी शिरसगाव धुपे गावावर मोठे प्रेम केले आहे गावात विकास कामांसाठी सातत्याने निधी दिला आहे तालुक्याच्या प्रत्येक मोठ्या सभेमध्ये आमच्या गावाचा अभिमानाने उल्लेख केला आहे. आम्ही गरीब आहोत पण लाचार नाही कायम साहेबांसोबत आहोत. काही मंडळींनी अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही एकत्र येऊन साहेबांना भेटलो आहे. यापुढेही सदैव साहेबांबरोबर राहू असा शब्द त्यांनी दिला.

जाहिरात

तर सरपंच प्रवीण दिघे म्हणाले की, आम्ही कधीही निष्ठा बदली नाही. मात्र काही मंडळीकडून अपप्रचार करण्यात आला असे काही नाही. ज्या माणसाने चाळीस वर्षात आम्हाला प्रेम दिले विकास योजना राबवल्या. आम्ही त्यांना कधीही सोडणार नाही. ज्यांना आमचे गाव माहित नाही त्यांच्या पाठीशी आम्ही कसे जाऊ असा सवाल ही त्यांनी विचारला

तर उपस्थित महिला  म्हणाल्या की, निवडणूक वगैरे आम्हाला काही कळत नाही पक्ष आम्हाला माहित नाही आमचा एकच पक्ष आहे तो म्हणजे बाळासाहेब थोरात साहेब. आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत साहेबांना सोडणार नाही असा शब्द दिल्यानंतर उपस्थित सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की संगमनेर तालुका हा विचारांचा तालुका आहे. तालुक्यातील प्रत्येक माणूस  हा कायम आपल्या सोबत राहिला आहे. राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते नसते शिरसगाव धुपे येथील आदिवासी व गरीब नागरिकांनी कायम साथ दिली आहे. त्यांच्या विकास कामांसाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले यावेळी सर्व नागरिक व महिलांशी आपुलकीने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चौकशी करून सर्वांशी संवाद साधला.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भेटीने शिरसगाव धुपे येथील युवक नागरिक व महिला सर्व आनंदी झाले. यावेळी उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे