आपला जिल्हा

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात मध्य प्रदेश दौऱ्यावर; वोट बचाव देश बचाओ अभियान

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात मध्य प्रदेश दौऱ्यावर; वोट बचाव देश बचाओ अभियान
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात मध्य प्रदेश दौऱ्यावर; वोट बचाव देश बचाओ अभियान
Sangmner vijay kapse दि २४ ऑक्टोबर २०२६–देशामध्ये सुरू असलेल्या मत चोरी बाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या वोट बचाव, देश बचाव अभियानांतर्गत महाराष्ट्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी प्रदेशाध्यक्ष तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात मध्यप्रदेश मधील भोपाळ, रायसेन, विदिशा या विविध जिल्ह्यांमध्ये दौरा करणार आहेत. याचबरोबर तेथील नागरिकांमध्ये संवाद साधून देशांमध्ये सुरू असलेल्या मत चोरी बाबत च्या अभियानामध्ये सहभागी होणार आहेत.

जाहिरात
देशामध्ये वाढलेली महागाई, बेरोजगारी ,जातीयवाद या विरोधात सर्वसामान्य नागरिक, महिला व तरुणांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे . केंद्र सरकारच्या विरोधात देशातील तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारने मत चोरी केली असून खासदार राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे व प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी सातत्याने यांनी याबाबत आवाज उठवला आहे. महाराष्ट्रातही लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी आवाज उठवला आहे.

जाहिरात

या अभियान लोकशाही अधिक ताकदवान करून देशातील राज्यघटना वाचवण्यासाठी संपूर्ण देशांमध्ये वोट बचाव ,देश बचाव हे अभियान सुरू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे या अभियानांतर्गत शनिवार 24 ऑक्टोबर ते सोमवार 26 ऑक्टोबर 2026 या काळात मध्यप्रदेश राज्याचा दौरा करणार आहे. या दरम्यान ते रविवारी भोपाळ येथे पत्रकार परिषदेत संवाद साधणार असून त्यानंतर भोपाळ शहर काँग्रेसच्या बैठकीत उपस्थित राहून आढावा घेणार आहेत.

जाहिरात

यानंतर दुपारी रायसेन जिल्ह्यात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीबरोबर पत्रकारांशी संवाद साधणार आहे त्यानंतर संध्याकाळी विदिशा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीबरोबर पत्रकार परिषदेतून काँग्रेस पक्षाची भूमिका मांडणार आहेत. यानंतर सोमवारी राजगड जिल्ह्यामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठकीबरोबर पत्रकारांशी संवाद आणि सिहोर जिल्ह्यामध्ये संध्याकाळी काँग्रेस पदाधिकारी व जिल्हा काँग्रेसची बैठक घेणार असून त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी संवाद साधणार आहे. अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित जागेच्या उमेदवारांच्या प्रचारातही ते सहभागी होणार आहे.

जाहिरात

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे