आपला जिल्हा

दुष्काळी परिस्थितीचा विचार करून जास्तीत जास्त आवर्तन पूर्ण क्षमतेने द्या; आमदार आशुतोष काळेंची कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मागणी

दुष्काळी परिस्थितीचा विचार करून जास्तीत जास्त आवर्तन पूर्ण क्षमतेने द्या; आमदार आशुतोष काळेंची कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मागणी

दुष्काळी परिस्थितीचा विचार करून जास्तीत जास्त आवर्तन पूर्ण क्षमतेने द्या; आमदार आशुतोष काळेंची कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मागणी

Kopargaon vijay kapse दि २४ ऑक्टोबर २०२६ :– कोपरगाव मतदारसंघात पाऊस अतिशय कमी झाला असून खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने परिसरात ओव्हरफ्लोचे पाणी फिरले असल्याने आजपर्यंत पाणी टिकून असले तरी पुढील परिस्थिती अतिशय गंभीर राहणार आहे. सुदैवाने सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत हि काहीसा दिलासा देणारी बाब आहे. यापूर्वी धरणे भरलेली असतांना रब्बी दोन आणि उन्हाळी हंगामात दोन आवर्तन देण्यात आले आहेत. परंतु यावर्षी पाऊस कमी झाला याची सर्वाना जाणीव आहे. त्यामुळे दिली जाणारी आवर्तन पूर्ण क्षमतेने द्यावीत व उन्हाळ्यात दोन आवर्तन द्यावेत तरच फळबागा आणि ऊस वाचणार असून शेतकऱ्यांना चारा पिके करता येणार आहेत. तुम्ही जलसंपदा मंत्री असल्यामुळे आम्हाला काळजी नाही कारण तुम्हाला सर्व परिस्थितीची जाणीव आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा गांभिर्याने विचार करून जास्तीत जास्त आवर्तन पूर्ण क्षमतेने द्यावेत अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्याकडे केली आहे.

जाहिरात

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता येथे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक शनिवार (दि.२४) रोजी पार पडली. या बैठकीत आ.आशुतोष काळे बोलत होते. ते म्हणाले की, गोदावरी उजव्या कालव्याचे आवर्तन सोडण्यापूर्वी चाऱ्यांची कामे पूर्ण करावी, उजव्या कालव्याच्या टेलच्या चाऱ्यांची कामे झाली असून वरच्या भागातील चाऱ्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.तसेच डाव्या कालव्यासह चाऱ्यांच्या नूतनीकरणासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु असून त्यासाठी निधी द्यावा. गोदावरी उजव्या आणि डाव्या कालव्यांवरील काही पुलांसाठी निधी उपलब्ध झाला असून ते काम जवळपास वर्षभरापासून थांबलेले आहे. ते काम लवकरात लवकर सुरु करण्याच्या सूचना द्याव्यात.आवर्तन कालावधीत मिळणाऱ्या मोठ्या कालावधीत प्रस्तावित कामांना मंजुरी मिळाल्यास ती कामे पूर्ण करता येणार आहे त्यासाठी प्रस्तावित कामांना मंजुरी द्यावी. महायुती शासनाने शेतकऱ्यांची कर्ज माफी केली असून साडेसात एचपी पर्यंतच्या शेती पंपाचे वीज बिल माफ केले. तसेच शेतकऱ्यांची पाणी पट्टी पूर्णपणे माफ करावी व खरिपाच्या आवर्तनाची देखील पाणी पट्टी माफ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. तसेच कोपरगाव नगरपालिकेची थकीत पाणी पट्टी माफ करावी अशी मागणी केली असता, जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी फक्त चालू वर्षाची पाणी पट्टी भरावी थकीत पाणी पट्टीबाबत नंतर निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

जाहिरात

याप्रसंगी आ.हेमंत ओगले, मा.आ.सौ.स्नेहलता कोल्हे,श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे, गोदावरी दुध संघाचे चेअरमन राजेश परजणे, नाशिक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने,उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, गोदावरी पाटबंधारे कोपरगाव उपविभागाचे अभियंता संदिप पाटील, राहाता उपविभाग अभियंता विवेक लव्हाट, शिर्डीच्या नगराध्यक्षा सौ.जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके, बाबासाहेब कोते, राजेंद्र खिल्लारी आदींसह पाटबंधारे विभागाचे अधिकारी, शेतकरी आदी उपस्थित होते.

जाहिरात

 

आमचे पाणी मिळणार नाही-

 कुठेच पाऊस पडतांना दिसत नव्हता त्यामुळे पुढील भीषण दुष्काळाच्या परिस्थितीची जाणीव अगोदरच झाल्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आम्ही वेळीच पाणी अडवायला सुरुवात केल्यामुळे आज आमच्या केटीवेअरमध्ये थोडे फार पाणी दिसत असले तरी ते पुरेसे नाही ते पाणी अगोदरच कमी आहे. त्यामुळे आम्ही आमच्या बंधाऱ्यातील पाणी खाली जावू देणार नाही.आम्ही कुणाचे पाणी घेतलेले नाही. खालचे बंधारे का भरले नाही? याचा जाब तुम्ही पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारा.पण तुम्हाला आमचं पाणी मिळणार नाही असे आमदार आशुतोष काळे यांनी ठणकावून सांगितले.

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे