आपला जिल्हा

जिल्हास्तरीय कुराश स्पर्धेत आत्मा मालिकच्या मल्लांची सुवर्ण झेप; २३ सुवर्णपदकांची लयलूट

जिल्हास्तरीय कुराश स्पर्धेत आत्मा मालिकच्या मल्लांची सुवर्ण झेप; २३ सुवर्णपदकांची लयलूट

२४ पदकांची कमाई; सर्व मल्लांची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

Kopargaon vijay kapse दि २३ नोव्हेंबर २०२६ : अहिल्यानगर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय कुराश कुस्ती स्पर्धेत आत्मा मालिक कुस्ती केंद्राच्या मल्लांनी दमदार कामगिरी करत तब्बल २३ सुवर्णपदकांसह एका रौप्यपदकाची कमाई केली. एकूण २४ पदके पटकावत आत्मा मालिकच्या मल्लांनी स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. या सर्व खेळाडूंची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जाहिरात

क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने २० नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रुद्र खिरडकर, साईराज म्हस्के, प्रसाद खर्से, रुद्र ढोणे, अक्षय देवगिरे, सार्थक जपे, राम वाजे, श्रीकांत कदम, शंभूराजे खोजे, यश येळे, प्रथमेश गायकवाड, कुणाल आढाव, तुषार रणसिंग, ऋषिकेश धुमाळ, साई ठाकूर, बजरंग शिंदे, रुद्राक्ष घुगे, हर्षल म्हस्के, श्रावण गायकवाड, साई काकड, ओम ठाकूर, योगेश शिंदे व श्रेयस शिंगारे यांनी सुवर्णपदके पटकावली, तर शिवमनी घुगे याने रौप्यपदक मिळवले.

जाहिरात

या यशाबद्दल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचे आशीर्वादही खेळाडूंना लाभले. यावेळी आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक भरत नायकल, शालेय व्यवस्थापक सुधाकर मालिक, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक पैलवान विवेक नायकल, प्रशिक्षक पैलवान राजू पाटील व पैलवान अक्षय डांगे उपस्थित होते.

जाहिरात

आत्मा मालिक कुस्ती केंद्राची यशस्वी परंपरा कायम – नंदकुमार सूर्यवंशी

आत्मा मालिक कुस्ती केंद्राच्या मल्लांनी २३ सुवर्णपदके पटकावत संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे. या केंद्राने सातत्याने विविध कुस्ती स्पर्धांमध्ये आपला दबदबा कायम ठेवला असून, महाराष्ट्र केसरी किताब विजेते मल्लही घडवले आहेत. खेळाडूंच्या या यशाचा अभिमान असल्याचे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले.

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे