आपला जिल्हा

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत सुरक्षा सप्ताह साजरा

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत सुरक्षा सप्ताह साजरा
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत सुरक्षा सप्ताह साजरा
जाहिरात

कोपरगांव विजय कापसे दि ६ मार्च २०२४–  सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर बुधवारी ५३ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यांत आला. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष मनेष गाडे होते. उपस्थित सर्व कामगारांना यावेळी सुरक्षा शपथ देण्यांत आली.

जाहिरात

            प्रारंभी व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे, रासायनिक पदार्थ हाताळतांना घ्यावयाची काळजी, सुरक्षीततेचे नियम इत्यादी बाबत मार्गदर्शन करून सुरक्षा सप्ताह साजरे करण्याचा उद्देश सांगितला. सुरक्षा अधिकारी सलमान शेख यांनी प्रदर्शनांतील आधुनिक सुरक्षा उपकरणांची माहिती दिली. गेल्या वर्षभरात कारखान्यांत अपघात टाळण्यासाठी ज्या कामगारांनी मदत केली त्यांना संचालक बाळासाहेब वक्ते, आप्पासाहेब दवंगे, निवृत्ती बनकर, ज्ञानेश्वर परजणे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व भेटवस्तु देउन त्यांचा सत्कार करण्यांत आला.

जाहिरात
            कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सुरूवातीपासुन या कारखान्यात रासायनीक प्रकल्प असल्यामुळे सर्वाच्या सुरक्षीततेला महत्व दिले होते त्याप्रमाणे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांनी कारखान्यात काम करणा-या प्रत्येक घटकाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत सुरक्षीततेची सर्व आधुनिक उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. अपघातामुळे आपल्याबरोबरच कुटूंब, परिसर, समाज, राष्ट्राची हानी होते ते टाळण्यासाठी प्रत्येकांने सतर्क असले पाहिजे. सुरक्षेचे नियम पाळले की मानवी चुकातुन होणारे अपघात सहज टाळता येतात.
          उपाध्यक्ष मनेष गाडे अध्यक्षपदावरून बोलतांना म्हणाले की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात कामगाराबरोबरच परिसराच्या सुरक्षीततेची काळजी घेतली जाते. कामगारांनी कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे सर्व नियम पाळले पाहिजे. कारखान्याबरोबरच तालुक्यात जेथे जेथे आपत्ती निर्माण झाली असेल त्या त्या वेळी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली आपल्या आपत्ती पथकातील प्रकाश डुंबरे व त्यांचे सर्व सहकारी संकटे दुर करण्यांसाठी आघाडीवर असतात संजीवनी उद्योग समुह ही आपली कामधेनू आहे तिची सर्वानी काळजी घ्यावी. शेवटी पी. एस. अरगडे यांनी आभार मानले. याप्रसंगी कामगार नेते मनोहर शिंदे, मानव संसाधन अधिकारी प्रदिप गुरव, सहजानंदनगर शाखेचे उपाध्यक्ष गणपतराव दवंगे, वेणुनाथ बोळीज, सर्व खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, कामगार मोठया संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन सुरक्षा अधिकारी सलमान शेख यांनी केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे