संजीवनी फार्मर्स फोरम मत्स्यबीज केंद्र उभारणी भूमीपुजन संपन्न
संजीवनी फार्मर्स फोरम मत्स्यबीज केंद्र उभारणी भूमीपुजन संपन्न
कोपरगांव विजय कापसे दि ११ मार्च २०२४– शेतीला जोडधंदा मिळावा या उददेशांने संजीवनी मत्स्य विकास सहकारी संस्था व संजीवनी फार्मर्स फोरमच्या सहकार्याने शेतक-यांना मागणीप्रमाणे मत्स्यबीज मिळावे म्हणुन मत्स्यबीज केंद्र उभारणीचे भूमिपुजन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांच्या हस्ते सोमवारी खिर्डीगणेश परिसरात संपन्न झाले.
प्रारंभी संजीवनी मत्स्य विकास सहकारी संस्थेचे अध्यक्ष कारभारी लभडे व उपाध्यक्ष विष्णुपंत क्षीरसागर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संजीवनी फार्मर्स फोरमचे संजीव पवार यांनी प्रास्तविक केले.
शेततळयाबरोबरच गोडया पाण्यातील मत्स्य शेती व्यवसायाला देशाबरोबरच महाराष्ट्र राज्याला चांगले दिवस असुन देशांतर्गत ६० हजार कोटी रूपयांची मासळी निर्यात होते त्यात एकटया तेलंगणा, आंधप्रदेश राज्याचा वाटा ४५ हजार कोटी रूपयांचा आहे. मत्स्य बीज संवर्धन ते विपणन पर्यंत सगळ्या गोष्टी एकाच छताखाली समासा शेतकऱ्यांना पुरवल्या जाणार आहेत. जास्तीत जास्त तरुणांनी मत्स्य शेतीकडे वळावे असेही ते म्हणाले.