काळे गट

आ. आशुतोष काळेंकडून वाकडी खंडोबा देवस्थानला ३५.५० लक्ष निधी देवस्थानच्या विकासाला आजपर्यंत दिले १.०५ कोटी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी मानले आभार

आ. आशुतोष काळेंकडून वाकडी खंडोबा देवस्थानला ३५.५० लक्ष निधी देवस्थानच्या विकासाला आजपर्यंत दिले १.०५ कोटी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी मानले आभार

आ. आशुतोष काळेंकडून वाकडी खंडोबा देवस्थानला ३५.५० लक्ष निधी देवस्थानच्या विकासाला आजपर्यंत दिले १.०५ कोटी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी मानले आभार

कोपरगाव विजय कापसे दि १६ मार्च २०२४ :- संपूर्ण राज्यात प्रतीजेजुरी म्हणून संबोधण्यात येणाऱ्या श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानसाठी आ. आशुतोष काळे यांनी पुन्हा ३५.५० लक्ष निधी दिला आहे. मागील साडे चार वर्षात आजपर्यंत वाकडी देवस्थानसाठी त्यांनी १.०५ कोटी निधी दिला असल्याची माहिती वाकडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब कोते यांनी दिली आहे. त्यामुळे वाकडीला येणाऱ्या खंडोबा भक्तांना अधिकच्या सोयी सुविधा मिळणार असून त्याबाबत खंडोबा भक्तांनी व वाकडीच्या सर्व पक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

जाहिरात

कोपरगाव मतदार संघातील वाकडी येथील प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र खंडोबाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी वर्षभर भाविकांची मांदियाळी असते. जे खंडोबा भक्त जेजुरी येथे जावू शकत नाही त्या भक्तांची वाकडीला नेहमीच दर्शनासाठी ये-जा असते. चंपाषष्ठी व भाऊबीज या देवस्थानचे हे वर्षातील दोन प्रमुख मोठे यात्रोत्सव. जागरण गोंधळ करणारी संपूर्ण महाराष्ट्रातील वाघे मंडळी दीपावलीच्या भाऊबीजेला घटस्थापना करून प्रथम जागरण गोंधळ घालतात व त्यानंतर राज्यातील कानाकोपऱ्यात जागरण गोंधळाचे धार्मिक विधी करण्यासाठी जातात त्यामुळे या देवस्थानला धार्मिक दृष्ट्या मोठे महत्व आहे.

जाहिरात

या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी आ. आशुतोष काळे यांनी यापूर्वी मंदिर परिसरात २० लक्ष निधी पेव्हर ब्लॉक बसविणेसाठी दिला असून त्यामुळे मंदिराची शोभा वाढली आहे. खंडोबा देवस्थानकडे येणारा रस्ता अरुंद असल्यामुळे उत्सवाच्या वेळी वाहतूक कोंडी होवून भाविकांना त्रास होत होता. हि अडचण दूर करण्यासाठी  आ. आशुतोष काळे यांनी दुसऱ्या टप्प्यात सिडी वर्क व रस्त्यांच्या दुतर्फा पेव्हर ब्लॉक बसविणेसाठी ५० लाख रुपये निधी दिला असून हे काम प्रगतीपथावर आहे.त्यामुळे वाकडीला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून त्याचा परिणाम वाकडी गावचा व्यवसाय वृद्धींगत होवून वाकडीचा विकास स्तर उंचावला आहे. अशा परिस्थितीत आ. आशुतोष काळे यांनी पुन्हा एकदा वाकडी देवस्थानसाठी ३५.५०लक्ष निधी दिला असून या निधीतून परिसर सुशोभिकरण, पथ दिवे, रस्ता रुंदीकरण आदी विकासकामे होवून परिसराचा कायापालट होणार आहे.

जाहिरात

   वाकडी देवस्थानसाठी कोटीच्या वर निधी देणाऱ्या आ. आशुतोष काळे यांनी वाकडी गावच्या विकासाला देखील निधी कमी पडू न देता आजपर्यंत ४४ कोटी निधी दिला आहे. यामध्ये जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेला २९.९८ कोटी निधी मिळवून दिला असून हे काम प्रगतीपथावर आहे. रस्त्यांसाठी व इतर विकासासाठी १४ कोटी निधी दिला आहे. तसेच पाणी पुरवठा साठवण तलावासाठी शेती महामंडळाची जागा मिळणेसाठी देखील त्यांचा पाठपुरावा सुरु आहे. त्याबद्दल वाकडीच्या सर्व पक्षीय नेत्यांनी श्री खंडोबा मंदिरात बैठक घेवून वाकडीच्या श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान व वाकडीच्या विकासाला कोट्यावधी निधी देणाऱ्या आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले. यावेळी  मा. ग्रा. सदस्य आण्णासाहेब कोते यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहारे. गणेश कारखान्याचे मा.व्हा.चेअरमन शिवाजीराव लहारे, माजी संचालक भाऊसाहेब शेळके, अनिल कोते, प्रभाकर एलम, भीमराज लहारे, वाकडी देवस्थानचे अध्यक्ष संजय शेळके, नितीन एलम, डॉ. वसंत लबडे, बि.डी शेळके, बाळासाहेब आहेर, डॉ. संपत शेळके. निलेश लहारे, बाबासाहेब शेळके, चंद्रशेखर लहारे आदी मान्यवर व वाकडी ग्रामस्थ उपस्थित होते.

आण्णासाहेब कोते

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे