हनुमान जन्मोत्सवानिमित्त १२५ किलो वजनाचा बजरंग गोटा उचलणे स्पर्धा संपन्न
हनुमान जन्मोत्सवानिमित्त १२५ किलो वजनाचा बजरंग गोटा उचलणे स्पर्धा संपन्न
हनुमान जन्मोत्सवानिमित्त १२५ किलो वजनाचा बजरंग गोटा उचलणे स्पर्धा संपन्न
शिर्डी विजय कापसे दि २३ एप्रिल २०२४– शिर्डी शहरात क्रांती युवक मंडळ आयोजित हनुमान जन्मोत्सव उत्सव समितीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सदर दक्षिणमुखी हनुमान मंदिर साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. हनुमान जन्मोत्सव निमित्ताने बजरंग बोटा उचलणे स्पर्धा,हनुमान याग महाआरती ,चांदीच्या गधेचे पूजन,महाप्रसाद वाटप यांसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .
या सर्वात महत्त्वाचे तरुणांचे आकर्षण म्हणजे १२५ किलो वजनाचा बजरंग गोटा उचलण्याची स्पर्धा या स्पर्धेचे उद्घाटन शिर्डी शहरातील विलास आबा कोते, दीपक वारुळे, अर्जुन जगताप,मधुकर कोते,किशोर गंगवाल ,दत्तू गोंदकर ,विजय ज्ञानेश्वर गोंदकर ,रमेश वाघचौरे,गोरडे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते बजरंग गोट्याचे विधिवत पूजन करण्यात आले शिर्डी शहरातील तरुणांनी मोठ्या संख्येने सदर स्पर्धेत भाग नोंदवत हनुमान जयंती निमित्त शक्तीची उपासना केली
१२५ किलोचा बजरंग गोटा उचलत असताना काही जण असफल झाले परंतु एकूण ५० तरुणांनी यामध्ये सहभाग नोंदविला व वीस तरुणांनी सदर गोटा यशस्वीरित्या उचलला यामध्ये सचिन तांबे,प्रशांत गोंदकर सुरेश सुपेकर राजेंद्र पांचाळ समाधान बनकर सोपान त्रिभुवन सागर बेलदार सुदर्शन वेरणेकर अमोल रोकडे यश चित्ते, अभिजीत बनकर यांनी उचलला. तसेच अनेक तरुणांनी सहभाग नोंदवला या सर्व यशस्वी तरुण स्पर्धकांचा सत्कार भाजपा अध्यक्ष सचिन शिंदे, विश्व हिंदू परिषदेचे सुरेंद्र महाले, युवा मोर्चाचे चेतन कोते, तानाजी गोंदकर,मणिलाल पटेल, दीपक रमेश गोंदकर या मान्यवरांच्या शुभहस्ते झाला.तसेच हनुमान यागाचे आयोजन करण्यात आले होते सदर याग करण्यासाठी विजय ज्ञानेश्वर गोंदकर,किशोर कोठारी, वीरेश जयस्वाल, गायके यांनी विशेष परिश्रम घेतले त्याचप्रमाणे सायंकाळी महाआरती व महाप्रसादाचे वाटपाचे नियोजन करण्यात आले क्रांती युवक मंडळाच्या माध्यमातून तरुणांच्या निर्व्यसनीकेचे प्रतीक असलेल्या चांदीच्या गधेचे पूजन हनुमान मंदिरात करण्यात आले. सदर कार्यक्रमात हनुमान भक्त शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
सदर कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी आकाश त्रिपाठी दत्तू झाकणे बबलू कोळकर आकाश वाडेकर शुभम नानेकर किरण परदेशी गणेश मिसाळ आदित्य वारुळे आर्यन तेजी सार्थक झाकणे यांच्यासह अनेक मित्र परिवारांनी प्रयत्न केले.
गेल्या २० वर्षांपासून आम्ही हनुमान जन्मोत्सवाच्या निमीत्ताने १२५ किलो वजनाचा बजरंग गोटा उचलण्याची अभिनव स्पर्धा आयोजित करतो. सुरवातीला फक्त २ तरुण हा गोटा उचलत परंतु आता १५ ते २० तरुण हा गोटा उचलून शक्तीची उपासना करतात तसेच तरुणांना वाईट कामापासून दूर ठेवण्यासाठी तरुणांच्या निर्वेसनीतेचे प्रतीक म्हणून चांदीच्या गधेचे पूजन करतो.
सचिन तांबे
क्रांती युवक मंडळ
मा. विश्वस्थ साईबाबा संस्थान