आपला जिल्हा

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सल्लागार समितीची बैठक संपन्न

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सल्लागार समितीची बैठक संपन्न

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सल्लागार समितीची बैठक संपन्न

जाहिरात

अहिल्यानगर विजय कापसे  दि २ जुलै २०२५वंचित घटकांना औपचारिक वित्तीय सेवांमध्ये समाविष्ट करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.

जाहिरात

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सल्लागार समितीची बैठक पार पडली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी मार्गदर्शन केले.

बैठकीस जिल्हा अग्रणी बँक अधिकारी आशिष नवले, नाबार्डचे विक्रम पठारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जाहिरात

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाच्या सूचनेनुसार संपूर्ण देशभरात १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत आर्थिक समावेशन योजनांची संपृक्तता मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम जिल्ह्यात विशेष उपक्रम म्हणून प्रभावीपणे राबविण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

जाहिरात गौतम

या मोहीमेअंतर्गत सर्व खातेधारकांच्या केवायसी (KYC) पुनर्पडताळणीसह विद्यमान निष्क्रिय PMJDY खात्यांचे पुनरुज्जीवन, बँक खाती नसलेल्या प्रौढांसाठी नवी खाती उघडणे, तसेच PMJJBY (प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना), PMSBY (प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना), आणि APY (अटल पेन्शन योजना) अंतर्गत नोंदणी यास प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच डिजिटल फसवणुकीपासून संरक्षण, दावा न केलेल्या ठेवींच्या पुनर्प्राप्तीसाठी मार्गदर्शन, व तक्रार निवारण प्रणाली याविषयी जनजागृती सत्रे घेण्यात यावीत, असेही त्यांनी सुचवले.

जाहिरात

या विशेष मोहीमेत उमेद, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि एनयूएलएम विभागाचे अधिकारी सक्रिय सहभाग नोंदवून बँकांना सहकार्य करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांना PMJJBY, PMSBY आणि APY योजनांमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. यासाठी बँक शाखा, शिबिरस्थळे व बँक व्यवसाय प्रतिनिधींनी गावोगावी जाऊन जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे