आपला जिल्हा

डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयात जागतिक योग दिन साजरा

डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयात जागतिक योग दिन साजरा

डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयात जागतिक योग दिन साजरा

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २३ जुन २०२६योग हा आपल्या भारताचा प्राचीन वारसा असून तो संपूर्ण जगात आरोग्य, मानसिक संतुलन आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रसिद्ध आहे. आधुनिक जीवनशैलीत तणाव, चिंता , अस्वस्थता वाढत असताना योग एक उपाय म्हणून प्रभावी ठरतो. नियमित योग साधनेमुळे एकाग्रता, आत्मविश्वास आणि आरोग्य सुधारते त्यासाठी योग साधना करणे अत्यंत गरजेचे असल्याचे डॉ. सी एम मेहता कन्या विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका उज्वला म्हस्के यांनी सांगितले.

जाहिरात

कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयात रविवार (दि.२१ जून ) रोजी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा आला. योग दिनाचे औचित्य साधून विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी योग साधना केली. यावेळी उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना उपमुख्याध्यापिका उज्वला म्हस्के बोलत होत्या. त्यांनी योग साधनेचे महत्व अधोरेखित करतांना सांगितले की, योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते. तसेच शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा प्राप्त होत असून योग केवळ व्यायाम नसून जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

जाहिरात

योग साधनेतून सर्वांगीण विकास साधता येतो आणि योग पुढील पिढीला आरोग्यदायी आणि शिस्तबद्ध जीवनशैलीकडे घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यालयाचे जेष्ठ क्रीडाशिक्षक देवकर सर व बोढरे सर यांनी विद्यार्थिनींकडून योगाच्या विविध आसनांचा सराव करून घेतला. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक सुनिता पवार, पर्यवेक्षक प्रभाकर आभाळे व सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे