आपला जिल्हा

निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष सतीश भालेकर एलसीबीच्या ताब्यात; मारहाण, लूट व खंडणी प्रकरणात कारवाई

निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष सतीश भालेकर एलसीबीच्या ताब्यात; मारहाण, लूट व खंडणी प्रकरणात कारवाई

निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष सतीश भालेकर एलसीबीच्या ताब्यात; मारहाण, लूट व खंडणी प्रकरणात कारवाई

Parner vijay kapse दि २३ जुन २०२६मारहाण, लूटमार आणि खंडणीशी संबंधित गुन्ह्यातील प्रमुख आरोपी म्हणून शोध घेत असलेल्या निलेश लंके प्रतिष्ठानचे पारनेर तालुकाध्यक्ष सतीश भालेकर यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक केली आहे. या कारवाईमुळे पारनेर तालुक्यासह सुपा एमआयडीसी परिसरात चर्चांना उधाण आले आहे.

जाहिरात

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, म्हसणेफाटा एमआयडीसी परिसरातील सिलॉन बेव्हरेज कॅन प्रा. लि. कंपनीच्या मानव संसाधन (एचआर) विभागप्रमुखांवर हल्ला करून त्यांची सोन्याची चैन हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जाहिरात

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या वैभव रामदास रिकामे (रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा) याला संबंधित कॉन्ट्रॅक्ट न मिळाल्याने नाराजी होती. त्यानंतर सतीश भालेकर यांच्या सांगण्यावरून कट रचण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

जाहिरात

रुई छत्रपती फाटा परिसरात एचआर हेड महाडीक यांची दुचाकी अडवून आरोपींनी त्यांना मारहाण केली. तसेच, सुपा एमआयडीसी परिसरात काम करण्यास मज्जाव करण्याच्या उद्देशाने धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेदरम्यान त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैनही हिसकावून नेण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात काही आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र सतीश भालेकर फरार असल्याने त्यांचा शोध सुरू होता. अखेर एलसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतल्याने तपासाला गती मिळाली आहे.

दरम्यान, सुपा व म्हसणेफाटा एमआयडीसी परिसरातील उद्योग व्यवस्थापक आणि व्यावसायिकांना पोलिसांनी आवाहन केले आहे. कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली दमदाटी, दबाव, खंडणीची मागणी किंवा अन्य प्रकारचा त्रास होत असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे