आपला जिल्हा

भाजपाच्या वतीने शुक्रवारी नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळा

भाजपाच्या वतीने शुक्रवारी नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळा

जलसंपदा मंत्री विखे पाटील आणि सभापती प्रा.राम शिंदे यांची उपस्थिती

Ahilyanagar vijay kapse दि.२३ जुन २०२६अहील्यानगर जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांचा नागरी सत्कार समारंभ शुक्रवार दि.२६जून रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आला असल्याची माहीती भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग आणि शहराचे अध्यक्ष अनिल मोहीते यांनी दिली.

जाहिरात

नुकत्याच संपन्न झालेल्या राहुरी विधानसभा आणि विधानपरीषदेची निवडणुक संपन्न झाली.राहुरी विधनासभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे उमेदवार आ.अक्षय कर्डीले मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. विधान परीषदेच्या निवडणुकीत अहील्यानगरचे भूमीपुत्र आणि गेली अनेक वर्षे पक्षाच्या संघटनात्मक कार्यात योगदान देणारे सुनिल कर्जतकर यांची विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवड झाली.आ.विवेक कोल्हे आ.प्राजक्त तनपुरे यांचीही विधनापरिषद निवडणुकीत बिनविरोध झालेली निवड ही भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक आणि जिल्हयाच्या विकासात्मक वाटचालीला आणि पाठबळ देणारे आहे.

जाहिरात

अहील्यानगर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवार दि.२६जून २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता जिल्हा सहकारी बँकेच्या सहकार सभागृहात जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधान परीषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या उपस्थितीत सर्व नवनिर्वाचित आमदारांच्या नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

जाहिरात

या सत्कार सोहळ्यास जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व आमदार नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांना निमंत्रित करण्यात आले असून, या समारंभास महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे