आपला जिल्हा

मारुतीराव तिडके महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

मारुतीराव तिडके महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

विज्ञान विभागाचा १०० टक्के तर वाणिज्य ७८.३७ टक्के तर कला विभागाचा ५५.५५ टक्के निकाल
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २४ मे २०२४महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला असून यात कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील श्री मारुतीराव दगडूजी तिडके पाटील ज्युनिअर कॉलेजने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

जाहिरात

या परीक्षेत सायन्स विभागातून प्रविष्ट झालेले ८२ विद्यार्थ्यांपैकी ८२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला असून यात प्रथम क्रमांक ओंकार शंकर कुऱ्हाडे (८४.१७%)  द्वितीय क्रमांक प्रतीक्षा बाबासाहेब वाणी (७१.३३) तर तृतीय क्रमांक कुणाल नितीन पवार (६७%) यांनी मिळवला आहे.

जाहिरात

वाणिज्य विभागात ३७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यात २९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ७८.३७% टक्के इतका निकाल लागला असून यात प्रथम क्रमांक राजेश्वरी गोरक्षनाथ गरुड(७१%) द्वितीय क्रमांक राधिका रामनाथ मोरे (६६.३३%)  तर तृतीय क्रमांक कीर्ती शैलेंद्र भुसारे (६२.८३%)  यांनी मिळवला आहे.

जाहिरात

कला विभागात २७ विद्यार्थी प्रविष्ट झाले झाले होते यात १५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ५५.५५ % टक्के इतका निकाल लागला असून यात प्रथम क्रमांक रोहित देविदास जगदाळे ( ५६.५०%) द्वितीय क्रमांक निखिल मच्छिंद्र शिंदे (५४%)  तर तृतीय क्रमांक वैष्णवी अनिल मोरे (५०.८३) यांनी मिळवला आहे.

जाहिरात

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष साहेबराव तिडके, प्रकाशराव तिडके, सचिन चांदगुडे, सिताराम गाडे, भास्कर चांदगुडे, प्राचार्य ए. आर.मांडवडे, यांच्यासह ठुबे सर, कैलास थोरात, आर. बी.पवार, अमोल पेटारे,, ए.एम.गाडे, टी.ए कदम, वर्षा कांदळकर, टी.ए.चांदगुडे,एस.एस.काशीद, जनार्दन सुपेकर, एन.डी.बोरसे, एन. ए. डोखे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह सर्व आजी-माजी विद्यार्थी व शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Oplus_131072

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे