गोदा व्हॅली ज्युनिअर कॉलेजची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम
गोदा व्हॅली ज्युनिअर कॉलेजची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम
विज्ञान शाखेचा १००% टक्के निकाल

कोपरगाव विजय कापसे दि २४ मे २०२४– महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्या मार्फत फेब्रुवारी मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला असून यामध्ये कोपरगाव तालुक्यातील ओम साई एज्युकेशन सोसायटी अंतर्गत गोदा व्हॅली ज्युनियर कॉलेज रवंदे यांचा विज्ञान शाखेचा निकाल १००% टक्के लागला आहे.

या परीक्षेत गोदा व्हॅली ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेमध्ये, प्रथम क्रमांक शुभम रंगनाथ कुटे (८४.३३%)द्वितीय क्रमांक साहिल विजय गाडे (८०.६७%) तृतीय क्रमांक हर्ष संजीव जगताप (७५.५०%) चतुर्थ क्रमांक ओम नितीन थोरात (७३.३३) तर पाचवा क्रमांक समृद्धी मोहन कासार (७२.६७) यांनी उत्कृष्ट गुण मिळवत विद्यालयाचे नावलौकिक केला आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सखाराम कदम, संस्थेच्या खजिनदार दिपाली चंद्रशेखर कदम, संस्थेच्या सदस्या सुनंदाताई सखाराम कदम तसेच ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य शैलेंद्र निरगुडे, शिक्षक प्रकाश गोरे, सचिन भागवत, संतोष सुर्यवंशी, रोहित मालकर, शितल कोतकर तसेच गोदा व्हॅली इंग्लिश मिडियम व इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका अनिता कडलक आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




