आपला जिल्हा

उसतोडणी कामगारांसाठी आरोग्य शिबिरे काळाची गरज- विश्वासराव महाले.

उसतोडणी कामगारांसाठी आरोग्य शिबिरे काळाची गरज- विश्वासराव महाले.
उसतोडणी कामगारांसाठी आरोग्य शिबिरे काळाची गरज- विश्वासराव महाले.
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १६ जानेवारी २०२६संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी सतत प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेतली असुन उसतोडणी कामगारांसाठी आरोग्य शिबीरे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन संचालक विश्वासराव महाले यांनी केले.

जाहिरात
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने कार्यस्थळावरील उसतोडणीसाठी आलेल्या मजुर, मुकादम, कामगार, महिला भगिनी, लहान मुले-मुली यांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर गुरूवारी आयोजित करण्यांत आले होते त्याचे उदघाटन करतांना ते बोलत होते.

जाहिरात
           प्रारंभी कारखान्याचे आरोग्य अधिकारी डॉ. मनोज बत्रा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उसविकास विभागाचे संदिप गवळी यांनी कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतुन उसतोडणी कामगारांचे आरोग्य सदृढ रहावे यासाठी हे शिबीर भरविल्याची माहिती दिली. डॉ. ओकांर दिघे यांनी प्रास्तविक केले. संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र पारखे यांनी उसतोडणी मजुरांची कामानिमीत्त नेहमीच भटकंती सुरू असते त्यामुळे त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते, गर्भवती महिलांना वेळेवर वैद्यकिय मदत व मार्गदर्शन मिळायला पाहिजे यासाठी शासनाचा आरोग्य विभाग सतत विविध उपक्रम राबवत असतो. स्त्री रोगतज्ञ डॉ. योगेश बनकर याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, उसतोडणी कामगारांची आर्थीक परिस्थिती हलाखीची असल्यांने त्यांच्या आरोग्याची नेहमीच हेळसांड होते. गर्भवती महिलांना थळांत काम करतांना काय काळजी घ्यावी याचेही पुरेसे ज्ञान नसते, अशा महिलांनी वेळच्यावेळी रक्त , लघवी चाचण्याबरोबरच सोनोग्राफी, रक्तदाब तपासणी केली पाहिजे. गर्भवती महिलांचा पोषक आहार कसा असावा याचीही माहिती करून घेवुन त्यानुसार दररोजचे भोजन असावे म्हणजे येणा-या बाळाचे आरोग्य पोषक राहते. नियमीत लोहयुक्त गोळया घेतल्या पाहिजे असेही ते म्हणाले.
              श्री. विश्वासराव महाले पुढे म्हणाले की, उसतोडणी कामगार हा कारखान्याचा महत्वाचा दुवा असुन हंगाम काळात थळामध्ये त्यांच्यासाठी ज्या मुलभूत सोयी सुविधा लागतात त्या माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सातत्याने उपलब्ध करून दिल्या असुन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे हे देखील त्याच काळजीने या घटकांच्या सर्व जबाबदा-या पार पाडत आहेत. उसतोडणी गर्भवती महिलांनी आपले आजार लपवुन न ठेवता वेळच्यावेळी ते वैद्यकिय विभागास सांगितले पाहिजे. त्यावर आरोग्य उपचार केले पाहिजे.
           याप्रसंगी संचालक बापूसाहेब बारहाते, रमेश घोडेराव, डॉ. विनया ढाकणे, डॉ. अश्विनी जाई बहार, आदि खातेप्रमुख, उपखातेप्रमुख उपस्थित होते. शेवटी मुख्य शेतकी अधिकारी नारायण चौधरी यांनी आभार मानले. उपमुख्य शेतकी अधिकारी सी. एन. वल्टे व त्यांच्या सर्व सहका-यांनी आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी करण्यांसाठी सहकार्य केले. उसतोडणी कामगारांना यावेळी मोफत औषधांचे वितरण करण्यांत आले. अंगणवाडी ताई व मदतनीस यांनी ऊस तोडणी मजुरांच्या लहान मुलांचे आरोग्य, वजन, उंची याची थेट थळात जाऊन नोंद घेत माता-भगिनींमध्ये जनजागृती केली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे