जलव्यवस्थापन, महिला सक्षमीकरण, कर्मचारी कल्याणासह नागरी सुविधांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय- नगराध्यक्ष पराग संधान
कोपरगाव नगरपरिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शहर विकासाच्या विविध विषयांना मंजुरी
Kopargaon vijay kapse दि २६ नोव्हेंबर २०२६–कोपरगाव नगरपरिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी नगरपरिषद कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.नगराध्यक्ष पराग संधान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने तसेच नागरिकांच्या हिताचे विविध महत्त्वपूर्ण विषय चर्चेला आले. जलसंधारण, पाणी नियोजन, महिला सक्षमीकरण, कर्मचारी कल्याण, शिक्षण, स्वच्छता आणि नागरी सुविधांशी संबंधित विषयांवर यावेळी विचारविनिमय करण्यात आला. विविध विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिली.जाहिरात
नगराध्यक्ष पराग संधान यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोपरगाव नगरपरिषदेत सत्ता मिळून वर्षपूर्ती होत असून आ. विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दृष्टीने नगरपरिषद प्रशासनाची वाटचाल सुरू आहे.शहरातील जलसंधारण, पाणी नियोजन व पाण्याच्या पुनर्वापराच्या दृष्टीने तलाव क्रमांक एक ते चारमधील गाळ काढण्यात येणार आहे.जाहिरात
कोपरगाव शहरातील खंदक नाल्याचे संरक्षण व विकासकामे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसेच तलाव क्रमांक एक, दोन, चार व पाच येथील लोखंडी पूर्व इनलेट जाळ्यांची दुरुस्ती करण्यात येणार असून जलशुद्धीकरण केंद्रात रिसायकलिंग टँक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गोदावरी नदीपात्रातील दत्तपार परिसरातील विहिरीचे पुनर्जीवन करण्याचेही नियोजन आहे.जाहिरात
नगरपरिषदेच्या जुन्या नोंदींचे जतन व व्यवस्थापन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. जन्म-मृत्यू नोंदींच्या डिजिटलायझेशनसाठी नगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या ४० ते ५० वर्षांपूर्वीच्या जुन्या नोंदींचे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या मदतीने जतन, व्यवस्थापन व डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे. तसेच मायनेट प्रणालीचे आधुनिकीकरण करून आयडब्ल्यूबीपी पोर्टलवर माहिती स्थलांतरित करण्यात येणार आहे.नगरपालिकेतील १८ निवृत्त कर्मचारी व लवकरच निवृत्त होणारा एक कर्मचारी अशा एकूण १९ कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांच्या जागी सेवेत सामावून घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी दहा लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.जाहिरात
शहरातील घनकचरा संकलन व वाहतुकीसाठी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून १५ ते १७ मोठ्या आकाराची वाहने खरेदी करण्यात आली आहेत. तसेच मनाई येथील घनकचरा डेपोचा विकास करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला आहे. शहरातील विविध सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि नागरी सुविधा अधिक भक्कम करण्यावरही भर दिला जाणार आहे.
शहरातील स्वामी समर्थ मंदिर परिसरातील भिंतीचे बांधकाम व सुशोभीकरण करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोपरगाव शहरात तीन ठिकाणी व्हेज फूड कोर्ट विकसित करण्याचा निर्णय नगरपरिषद प्रशासनाने घेतला आहे.प्रभाग क्रमांक नऊमधील विविध रस्त्यांच्या कामांसाठी सुधारित अंदाजपत्रके तयार करण्याबाबत तसेच स्वच्छता विभागासाठी शहरातील १५ प्रभागांमध्ये स्टोरेज कॅबिन उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, पाणी नियोजन, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, कर्मचारी कल्याण आणि प्रशासकीय कामकाजाचे आधुनिकीकरण या विषयांना सभेत प्राधान्य देण्यात आले. आ. विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन प्रयत्नशील असल्याचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत यांच्यासह नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, गटनेते, अधिकारी व कर्मचारीवृंद उपस्थित होते.