राज्य फेडरेशनची क्रास प्रणाली वापरल्याशिवाय कर्ज वितरण करू नये – अध्यक्ष काका कोयटे
राज्य फेडरेशनची क्रास प्रणाली वापरल्याशिवाय कर्ज वितरण करू नये – अध्यक्ष काका कोयटे
कोपरगाव विजय कापसे दि १६ जुन २०२४ : तालुक्यातील सहकारी पतसंस्थांनी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची क्रास प्रणाली वापरल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे कर्ज वितरण करणार नसल्याचा ठराव एक मताने करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधी संघ, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कोपरगाव आणि कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्थांची आढावा बैठक विचार मंथन व प्रशिक्षण शिबिर स्व. यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात कोपरगाव तालुका सहकारी संस्था सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्या वेळी ते बोलत होते.

राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रविकाका बोरावके यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाला अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा, राज्य फेडरेशनचे संचालक वासुदेव काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय मनोगतातून नामदेव ठोंबळ यांनी विविध कर प्रणालीनुसार तालुक्यातील पतसंस्थांनी कामकाज करण्याचे अपेक्षा व्यक्त करत सहकार खात्याने घालून दिलेल्या नियमानुसार काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. तालुक्यातील सहकारी पतसंस्थांना कोपरगाव तालुक्यातील सहकारी संस्था कार्यालय सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. तसेच तालुक्यातील सहकारी पतसंस्था प्रतिनिधींची ३ महिन्यातून एकदा आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणार असल्याचे सांगितले.

या प्रसंगी राज्य फेडरेशनचे संचालक वासुदेव काळे म्हणाले की, सहकारी पतसंस्था मजबूत असेल, तर पतसंस्था फेडरेशन मजबूत बनते. त्यासाठी राज्य फेडरेशन अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यात आढावा बैठका, विचार मंथन शिबीरे आयोजित करून पतसंस्था मजबूत बनवण्याचं काम करत आहे. या साठी राज्य फेडरेशनला अहमदनगर जिल्ह्यातून उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. तसेच कोपरगाव तालुक्यातील ज्या सहकारी पतसंस्था राज्य फेडरेशन व तालुका फेडरेशन च्या सभासद नसेल त्यांना सभासद होण्याचे आवाहन वासुदेव काळे यांनी केले

