मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा वारसा- जिल्हाप्रमुख औताडे
शिवसेनेचा ५८ वा वर्धापनदिन मोठ्या जल्लोषात विविध उपक्रमांनी कोपरगाव तालुक्यात साजरा
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि १९ जुन २०२४– महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने चांगली कामगिरी केली असून सात खासदार निवडून आले आहेत.शिवसैनिकांना बळ देत असतानाच महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक विकासाभिमुख कामे केलेली आहेत .शिवसेना पक्ष बळकटीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराचा वारसा लाभलेला आहे असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी शिवसेनेच्या वतीने शिवसेना पक्षाचा ५८ वा वर्धापन दिन निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
जाहिरात
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त कोपरगाव नगरपालिका शाळा क्र ९ येथे शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले या प्रसंगी औताडे यांनी पुढे बोलतांना सांगितले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेना पक्षाची स्थापना करून ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण याप्रमाणे महाराष्ट्रात काम केले आज हाच वारसा पुढे समोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करत असल्याचेही नितीनराव औताडे यांनी सांगत सर्वाना शुभेच्छा व्यक्त केल्या.
जाहिरात
या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे शिवाजी जाधव,मनिल नरोडे,रावसाहेब थोरात,अभिषेक आव्हाड,अक्षय जाधव,मनोज राठोड,सनी गायकवाड,मीनाक्षी वाकचौरे,भारत कुऱ्हाडे, हेमा तवरेज,मधुकर टेके,राजेंद्र वाळुंज,घनश्याम वारकर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.