आपला जिल्हा

शिर्डीत एक दिवसीय सौंदर्य स्पर्धा व कार्यशाळेचे आयोजन- जयश्री रोहमारे

शिर्डीत एक दिवसीय सौंदर्य स्पर्धा व कार्यशाळेचे आयोजन- जयश्री रोहमारे

शिर्डीत एक दिवसीय सौंदर्य स्पर्धा व कार्यशाळेचे आयोजन- जयश्री रोहमारे

जाहिरात

शिर्डी विजय कापसे दि २१ जुलै २०२४अहमदनगर जिल्हा उद्योग केंद्र अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत प्रशिक्षण संस्था एम सी इ डी सोबत संलग्नित कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील ताराराणी मल्टी ट्रेड अँड सर्विसेस कंपनीच्या संयुक्त विद्यमानाने दि ६ ऑगस्ट २०२४ रोजी शिर्डी येथील पुष्पक रीसॉर्ट  मध्ये ब्युटी पार्लर क्षेत्रात काम करत असलेल्या महिला मुलींसाठी एक दिवसीय सौंदर्य स्पर्धा व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रमाच्या आयोजक जयश्री रोहमारे यांनी दिली आहे.

जाहिरात

याविषयी जयश्री रोहमारे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, ग्रामीण भागातील ब्युटी पार्लर क्षेत्रात काम करत असलेल्या महिला मुलींना आजच्या आधुनिक युगातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी या उद्देशाने या सौंदर्य स्पर्धेचे व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगीअहमदनगर  जिल्हा उद्योग केंद्राचे दवंगे व विभागीय अधिकारी अलोक मिश्रा हे सहभागी झालेल्या महिला व मुलींना शासनातर्फे ब्युटी पार्लर व्यवसायासाठी मिळणारे ३५ टक्के सबसिडी कर्जाबाबत  मार्गदर्शन करणार आहेत तरी या स्पर्धेचा जास्तीत जास्त महिला मुलींनी लाभ घ्यावा असे आव्हान आयोजक रोहमारे यांनी केले आहे.

Oplus_131072

शिर्डी येथे ६ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या इज दिवसीय सौंदर्य स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकाचे ५५५५ रुपयेचा द्वितीय क्रमांकाचे ४४४४ रुपयेचा तृतीय क्रमांकाचे ३३३३ रुपयेच चतुर्थ क्रमांकाचे २२२२ रुपयेचा तर पाचव्या क्रमांकाचे विजेत्या स्पर्धकास ११११ रुपयाचे रोख स्वरूपात बक्षीस व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. याप्रसंगी इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट प्राजक्ता मुळे यांचा लाईव्ह मेकअप शोचा भव्य कार्यक्रम ३ ते ५ या वेळेत होणार आहे.

Oplus_131072

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे