संगमनेरच्या युवक कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदी निखील पापडेजा यांची फेरनिवड
युवक काँग्रेसची नवीन कार्यकारिणी जाहीर
संगमनेर प्रतिनिधी दि २१ जुलै २०२४– काँग्रेस पक्षाचे मा.प्रदेशाध्यक्ष तथा विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर युवक काँग्रेसच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी युवा नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आल्या असून शहराध्यक्षपदी निखिल वेदप्रकाश पापडेजा यांची एक मताने फेर निवड झाली आहे.
वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा. आ.डॉ.सुधीर तांबे, युवक आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निखिल पापडेजा यांनी मागील पाच वर्षे शहराध्यक्ष पद अत्यंत सक्षमपणे सांभाळले असून अनेक युवकांना मोठी संधी दिली आहे. त्यामुळे त्यांची शहराध्यक्षपदी फेर निवड झाली आहे. तर कार्याध्यक्ष – वैष्णव राजकुमार मुर्तडक, अमित गुंजाळ,गोपी जहागीरदार तर उपाध्यक्ष म्हणून सुरभी असोपा, मनोज पुंड, श्रेयश कर्पे, संकेत रघुनाथ आव्हाड, विशाल भारत ढोले, नितीन अंबादास शिंदे यांची निवड झाली आहे. आणि युवक पदाधिकारी म्हणून विजय उदावंत, निखील बाळासाहेब पवार, अंकुश ताजणे, सुमित पांडुरंग पवार, कमलेश उनवणे, एकनाथ श्रीपत, गगन थोरात, आशिष कोठवळ, शहाबाज अली शेख यांची, तर माध्यम आणि प्रचार समन्वयक म्हणून अभिजीत दिड्डी,अतुल लहामगे संशोधन आणि कौशल्य विकाससाठी फरहान रईस शेख, रुपेश रहाणे,संघटन विस्तारपदी अभिजीत पुंड, अदिती अभय खोजे, अतुल अभंग, कन्हैया मंडलिक, किशोर संपत बोऱ्हाडे, प्रसाद कोळपकर यांची तर सोशल मीडिया समन्वयक म्हणून नितेश वसंत शहाणे, प्रथमेश मादास, फरहान बागवान क्रीडा समन्वयक म्हणून अंबादास आडेप (अध्यक्ष), तृष्णा औटी (उपाध्यक्ष), हैदर अली (कार्याध्यक्ष), किरण विठ्ठल वर्पे (सचिव) यांची निवड झाली आहे. सांस्कृतिक उपक्रम समन्वयक म्हणून अमेय जोशी, सागर अर्जुन कानकाटे, ऐश्वर्या वाकचौरे, आलोक प्रकाश बर्डे, शर्मिला हांडे प्रोफेशनल, लीगल समन्वयक म्हणून नयना परदेशी, ॲङ.प्रसाद भडांगे, शिवानी वाघ यांची तर प्रभाग युवक काँग्रेस समन्वयक म्हणून मनीष कन्हैया कागडे, तुषार वनवे, सागर अशोक पगारे, सिध्देश घाडगे, वसीम अत्तार यांची निवड झाली आहे. तर महासचिव म्हणून बंटी संजय पवार, अक्षय मुकुंद दीक्षित, वैभव शिवाजी कोल्हे, शेखर रमेश वडजे,सौरभ रमेश उमरजी, रोहित चंद्रकांत जंगम, आनंद पवार, प्रशांत सुभाष भोर, झहीर देशमुख, मोहसीन शफी तांबोळी, प्रतिक क्षत्रिय,सुमित वाघमारे,विशाल वैराळ,योगेश विलास गोसावी, संतोष अभंग, रोहित राजेंद्र बनकर, सागर परदेशी, सोहेल पिंजारी, समीर सय्यद, तौफिक मणियार,मुनवर बशीर कुरेशी,आकाश काठे, प्रमोद गणोरे, साहिल शेख यांची तर युवक पदाधिकारी म्हणून तरन्नुम तांबोळी,आयान बशीर शेख,शुभम मनोज परदेशी,अक्षय नाकील, सिंकदर जुबेर शेख, ऋषिकेश बद्दर,लौकीक शाह,चेतन विठ्ठल गायकवाड,प्रसाद पाटणकर, बाबासाहेब शांताराम राऊत, संकेत मुळे, कृष्णा (चव्हाण) पवार, ओम भारत कळसकर, स्वरुप संजय चोपडा, आदित्य बर्गे, कैसर कुरेशी यांची निवड झाली आहे.
या सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा.आमदार डॉ.सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, बाबासाहेब ओहोळ, रणजितसिंह देशमुख, शंकरराव खेमनर, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, ॲड. माधवराव कानवडे, रामहरी कातोरे, अर्चनाताई बालोडे, सुरेश झावरे, अजय फटांगरे, नवनाथ आरगडे, निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, सुभाष सांगळे, हैदर अली, आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.