आपला जिल्हा
उक्कडगावच्या शिवअमृत महाविद्यालयात ११ वी प्रवेशित विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
उक्कडगावच्या शिवअमृत महाविद्यालयात ११ वी प्रवेशित विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
उक्कडगावच्या शिवअमृत महाविद्यालयात ११ वी प्रवेशित विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
कोपरगाव विजय कापसे दि २० जुलै २०२४– कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील अण्णासाहेब लावरे सेवा संस्था संचलित, शिवअमृत कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता इयत्ता अकरावी वर्गातील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात नुकताच संपन्न झाला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. शिवाजी लावरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवबालक इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य प्रमोद देशमुख व सुवर्णा सोनवणे हे उपस्थित होते.
यावेळी प्रा. बाबासाहेब पिंपळे यांनी नविन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपली शक्ती ओळखून आपल्या क्षेत्रात आवड निर्माण करावी व आपले शिक्षण यशस्वी करून दाखवावे असा मोलाचा सल्ला दिला तर प्रा संदीप जाधव यांनी आपले मार्गदर्शन करताना शिक्षणाबरोबरच कौशल्य प्राप्त करून जीवन यशस्वी करावे असे सांगत सर्वाना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी लावरे यांनी बोलताना सांगितले की, ग्रामीण भागात असलेले आपले महाविद्यालय हे फक्त ग्रामीण भागातील मुलींकरता असल्याचा हेतू स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी बाह्य परिस्थिती बघता त्या संस्कृतीचा आपल्या शिक्षणावर व महाविद्यालयावर परिणाम होऊ देऊ नका. आपण आपल्या कुटुंबाचा विचार डोक्यात ठेवून शिक्षण घ्यावे व सामाजिक गुन्हेगारी पासून दूर राहावे तसेच आपला शैक्षणिक उद्देश सफल होऊन आपले शिवअमृत महाविद्यालयाचे वेगळेपण सिद्ध करावे असा मोलाचा संदेश लावरे यांनी देत सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य शरद भुजाडे, विभाग प्रमुख रामेश्वर टुपके, प्रा.ऋषीकेश थोट, प्रा.अक्षय इंगळे, प्राध्यापिका मोनाली वारकर, पूनम भगुरे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता बारावी ची विद्यार्थिनी कावेरी निकम व निकिता निकम यांनी केले तर उपस्थितांचे आभार चित्रा निकम हिने व्यक्त केले.