आपला जिल्हा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

Shrirampur vijay kapse दि २८ सप्टेंबर २०२६– मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, त्यांच्या कार्यकाळातील निर्णयांची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच दोष आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण उत्तरच्या वतीने करण्यात आली. याबाबत श्रीरामपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना सोमवारी, दि. २८ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले.

जाहिरात

निवेदनात काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या अलीकडील वृत्ताचा दाखला देत, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यांत आयोगाच्या काही निर्णयांवर किमान १४ वेळा आक्षेप नोंदविल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. विशेषतः मतदार यादीतील नावांची भर, वगळणे तसेच विशेष सखोल पुनरावलोकनाच्या प्रक्रियेशी संबंधित निर्णयांवर मतभेद झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

जाहिरात

मतदार याद्यांच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेत पात्र मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीतून वगळले जाणे ही गंभीर बाब असून, मतदार याद्यांच्या प्रक्रियेत पारदर्शकता, निष्पक्षता आणि जबाबदारी निश्चित करण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या ‘वोट चोरी’च्या आरोपांचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी काँग्रेसने केली.

जाहिरात

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळातील निर्णयांची कायदेशीर तपासणी करण्यात यावी, आयोगाच्या निर्णयांवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती अथवा घटकांची चौकशी करण्यात यावी आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

दरम्यान, या मुद्द्यावर काँग्रेसकडून देशभरात निदर्शने करण्यात आली असून, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी पक्षाने केली आहे.

यावेळी काँग्रेस उत्तर जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ. प्रभावती घोगरे, संगमनेर तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, कार्याध्यक्ष अमोल शेलकर, अभिजित लुनिया यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे