आपला जिल्हा

आदिवासी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदांवर पोहोचावे – मा. आ. स्नेहलता कोल्हे

आदिवासी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदांवर पोहोचावे – मा. आ. स्नेहलता कोल्हे
कोपरगाव मतदारसंघातील कोळगाव थडी येथे आदिवासी बांधवांना स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते जातीच्या दाखल्यांचे वाटप
Kopargaon vijay kapse दि २० नोव्हेंबर २०२६ – आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना जातीचा दाखला मिळणे म्हणजे केवळ कागदपत्र मिळणे नव्हे, तर त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या होण्याची सुरुवात आहे. जातीचे दाखले मिळालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदांवर पोहोचावे. जातीचा दाखला मिळाला म्हणजे जबाबदारी संपली असे नाही, तर त्यांच्या प्रगतीचा खरा प्रवास सुरू झाला आहे, असे प्रतिपादन मा. आ. स्नेहलता कोल्हे यांनी केले.

जाहिरात
संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आ. विवेक भैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर रोजी कोळगाव थडी येथे आदिवासी बांधवांना जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सहकारमहर्षी स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आदिवासी बांधवांच्या वतीने मा. आ. स्नेहलता कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला.

जाहिरात
मा. आ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, जातीचा दाखला हा आदिवासी समाजाची ओळख आणि त्यांच्या हक्काचा पुरावा आहे. शिक्षण, नोकरी, शिष्यवृत्ती तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तो महत्त्वाचा आहे. हा दाखला मिळवण्यासाठी आदिवासी बांधवांना शासकीय कार्यालयांचे वारंवार हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे एकाच ठिकाणी दाखले उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम आनंददायी आणि समाधानकारक आहे. प्रत्येकाने मिळालेला दाखला जपून ठेवावा.

जाहिरात
आदिवासी समाजातील पुढील पिढी शिक्षित, सक्षम आणि स्वावलंबी झाली पाहिजे. आदिवासी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदांवर पोहोचावे आणि आदिवासी बांधवांनी शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेत मुख्य प्रवाहात यावे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शासनातील सर्व नेत्यांचा आदिवासी समाजाच्या विकासावर भर आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील महिला असून देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर कार्यरत आहेत, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्रपतीपदावर काम करण्याची संधी मिळाली आहे, असेही मा. आ. स्नेहलता कोल्हे यांनी नमूद केले.
आदिवासी समाजाची शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगती व्हावी, हा सहकारमहर्षी स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांचा नेहमीच उद्देश होता. आदिवासी समाजाचे कोणतेही काम असले, तरी कोल्हे साहेब ते पोटतिडकीने करायचे. आदिवासी बांधवांसाठी खावटी कर्ज, पशुधन आणि गायींचे वाटप असे उपक्रम त्यांनी राबविले. आदिवासी बांधव आणि कोल्हे परिवाराचे जिव्हाळ्याचे नाते असून ही परंपरा पुढेही सुरू राहील, असे मा. आ. स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आदिवासी महिला भगिनींशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी कोल्हे परिवार पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.

जाहिरात
कार्यक्रमास संचालक राजेंद्र कोळपे, माजी सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, पुंजाजी राऊत, शिवाजीराव निंबाळकर, शामराव मेहरखांब, बाळासाहेब निंबाळकर, बाबासाहेब निंबाळकर, अनिल आंबेकर, अरुण मुटकुळे, किसन राऊत, उत्तमराव मेहरखांब, सुभाष निंबाळकर, चंदू मोरे, रामा माळी, मयुरेश राऊत यांच्यासह परिसरातील आदिवासी बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे