अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या पहिल्याच संचालक मंडळ बैठकीत १ कोटींची मदत जाहीर

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या पहिल्याच संचालक मंडळ बैठकीत १ कोटींची मदत जाहीर
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या पहिल्याच संचालक मंडळ बैठकीत १ कोटींची मदत जाहीर
Ahilyanagar vijay kapse दि २० नोव्हेंबर २०२६ : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने पहिल्याच बैठकीत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत उपाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्यासह संचालक मंडळाने या निर्णयाला सहमती दर्शवली. विशेष म्हणजे, जिल्हा बँक व बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतनाचाही सहभाग असणार आहे.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा सहकारी बँक आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊन हा निधी त्यांच्याकडे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात येणार आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनीही आपल्या एक दिवसाच्या वेतनातून या मदतकार्यात योगदान देण्याची भूमिका घेतली आहे.
मदतीचा निर्णय घेताना बँकेच्या आर्थिक परिस्थितीचाही गांभीर्याने विचार करण्यात आला. बँकेचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याबरोबरच जिल्ह्यातील शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठीही पुढाकार घेणे आवश्यक असल्याची भूमिका अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आणि संचालक मंडळाने घेतली. बँकेची आर्थिक क्षमता आणि आर्थिक शिस्त लक्षात घेऊनच मदतीचा निर्णय घेण्यात आला.

दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेकडून आर्थिक मदत करण्याची परंपरा यापूर्वीही जपली गेली आहे. यंदाही त्याच सामाजिक बांधिलकीतून बँकेने पुढाकार घेत ही परंपरा कायम ठेवली आहे. बँकेच्या निधीसोबतच कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतनाचा सहभाग हा या निर्णयातील महत्त्वाचा भाग ठरणार आहे.
शेतकऱ्यांचे हित, बँकेची आर्थिक शिस्त आणि सामाजिक बांधिलकी या तिन्ही बाबींचा समतोल साधत नवनिर्वाचित संचालक मंडळाने आपल्या पहिल्याच बैठकीत दुष्काळग्रस्तांच्या मदतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या नव्या नेतृत्वाच्या कार्यकाळाची सुरुवात सामाजिक उत्तरदायित्वाच्या निर्णयाने झाली आहे.




