आपला जिल्हा

आषाढी एकादशी पर्वकाळात कोपरगाव बस आगार मालामाल;  पंढरपूर बस फेऱ्या मधून तब्बल १९ लाखाचे उत्पन्न

आषाढी एकादशी पर्वकाळात कोपरगाव बस आगार मालामाल;  पंढरपूर बस फेऱ्या मधून तब्बल १९ लाखाचे उत्पन्न
आषाढी एकादशी पर्वकाळात कोपरगाव बस आगार मालामाल;  पंढरपूर बस फेऱ्या मधून तब्बल १९ लाखाचे उत्पन्न
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २७ जुलै २०२४संबंध महाराष्टाचे श्रध्दास्थान असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनाला आषाढी एकादशीच्या पर्वकाळात लाखो भाविक राज्यभरातून पंढरपूर ला पायी वारी ने अथवा मिळेल त्या वाहनांने येत असतात यातील बरेच भाविक परतीच्या प्रवासाला महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या एस टी बस चा वापर करत असतात यातूनच यंदाच्या वर्षी कोपरगाव बस आगाराच्या योग्य नियोजनाने  कोपरगाव ते पंढरपूर वाढीव बस फेऱ्याच्या माध्यमातून मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी तब्बल २ लाख रुपयांची उत्पनात वाढ झाली असल्याची माहिती कोपरगाव बस आगार प्रमुख अमोल बनकर यांनी दिली आहे.

जाहिरात

या विषयी बनकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, मंगळवार ९ जुलै ते सोमवार दि २२ जुलै २०२४ या १४ दिवसाच्या आषाढी एकादशीच्या पर्वकार्यकाळात कोपरगाव बसआगारच्या वतीने ज्या भाविकांना पायी जाणे शक्य नाही त्यांचा साठी कोपरगाव आगाराच्या वतीने ३० ज्यादा बसेसच्या माध्यमातून २१२ फेऱ्या कोपरगाव पंढरपूर मारत ११ हजार भाविकांना पंढरपूर दर्शन घडवत यातून १९ लाख ७ हजार ६४८ इतके भरघोस उत्पन्न मिळाले असून हे मागील वर्षाच्या तुलनेत २४ फेऱ्या अधिकच्या मारत उत्पनात देखील २ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. तर जुन २०२४ या महिन्यात  तालुक्यातील ग्रामीण भागातील ४ हजार विद्यार्थीनीना अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत मोफत बस पास वाटप तसेच ३ हजार विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात बस पास वाटप करण्यात आले आहे. तसेच शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करत या सर्वांचे एकत्रित २५ लाख रुपयाचे अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक उत्पन्न कोपरगाव बस आगाराचे असल्याचे आगार प्रमुख अमोल बनकर यांनी सांगितले आहे.

जाहिरात

या कामी वाहतूक विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ, यंत्र अभियंता अमर पंडित, विभागीय अधिकारी कमलेश धनराळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव आगार प्रमुख अमोल बनकर, सहाय्यक वाहतूक अधीक्षक योगेश दिघे, आगार लेखाकर एस.आर गवळी, वाहतूक निरीक्षक जी.बी खेमनर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक एस.एस आहेर यांसह कोपरगाव आगारातील सर्व चालक,वाहक,प्रशासकीय कर्मचारी,अधिकारी, गॅरेज विभागाचे कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून या सर्वांचे वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.

बस स्टँड

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे