संगमनेर
अमृतवाहिनी निडो स्कूलचे विद्यार्थी इस्रोला भेट देणार
अमृतवाहिनी निडो स्कूलचे विद्यार्थी इस्रोला भेट देणार

संगमनेर प्रतिनिधी दि २७ जुलै २०२४–अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या, अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी डॉ.सी.व्ही.रमण बाल वैज्ञानिक परीक्षेत उत्कृष्ट यश मिळविले आहे. वरद पाचोरे (इयत्ता सातवी) याने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला, तर पृथ्वीराज नेहे याने जिल्हास्तरावर तिसरा क्रमांक मिळविला आहे. दोन्ही विद्यार्थ्यांनी एका विशेष वैज्ञानिक कार्यशाळेत स्थान मिळवून त्यांनी श्रीहरीकोटा,इस्रोच्या दौऱ्यावर जाण्याची सुवर्ण संधी या बालवयात मिळविली आहे.

