विखे-पाटील

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय, विळद घाट येथे संविधान दिन साजरा

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय, विळद घाट येथे संविधान दिन साजरा

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय, विळद घाट येथे संविधान दिन साजरा

जाहिरात देवकर

अहिल्यानगर विजय कापसे दि ३० नोव्हेंबर २०२४डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, कृषी महाविद्यालय, विळदघाट, अहिल्यानगर येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. सदरील कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान प्रास्ताविकेच्या वाचनाने संपन्न झाला.

जाहिरात पहाडे

याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर धोंडे यांनी अध्यक्षीय मनोगतात भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये, महत्त्व व इतिहास, भारतीय लोकशाही करता भारतीय संविधानाची आवश्यकता याबाबतचे मार्गदर्शन उपस्थितांना केले. तसेच यावेळी मुंबई येथे झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना अभिवादन देखील करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण दांगडे यांनी केले.

जाहिरात लकारे

याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. एस. बी. राऊत, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. डी. एम. नलावडे, सहयोगी प्रा. डॉ. एच. एल. शिरसाठ तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. एस. बी. राऊत यांनी केले.

जाहिरात लहिरे
जाहिरात निखाडे
जाहिरात जगताप
जाहिरात म्हस्के

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे