कोपरगावच्या ग्रामीण भागात पोलिसांचा व सीआरपीएफ जवानांच्या वतीने रूट मार्च -पोलिस निरीक्षक कोळी
कोपरगावच्या ग्रामीण भागात पोलिसांचा व सीआरपीएफ जवानांच्या वतीने रूट मार्च -पोलिस निरीक्षक कोळी
कोपरगावच्या ग्रामीण भागात पोलिसांचा व सीआरपीएफ जवानांच्या वतीने रूट मार्च -पोलिस निरीक्षक कोळी
कोपरगाव विजय कापसे दि ३० ऑक्टोबर २०२४– गेल्या १५ ऑक्टोबर पासून राज्यात विधानसभेची आचारसंहिता लागू झाली असून २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यात एकाच वेळी विधानसभेकरता प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया होणार असून ही सर्व मतदान प्रक्रिया कोपरगाव विधानसभा कार्यक्षेत्रात शांततेत व भयमुक्त पार पाडावी या दृष्टीने कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सुरेगाव व कोळपेवाडी गावात पोलीस व सीआरपीएफ जवानांच्या वतीने एकत्रित रूट मार्च काढण्यात आला असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्त असे की, अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशान्वये कोपरगाव विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११:३० ते १२:४५ च्या दरम्यान कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सुरेगाव व कोळपेवाडी गावातील मुख्य बाजारपेठ, मिश्र वस्ती, शनी चौक, सुरेगाव पासून ते श्रीराम चौक, अहिल्यादेवी चौक व कोळपेवाडी गावातून कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ४ अधिकारी १५ पोलीस अंमलदार तसेच सीआरपीएफ प्लाटूनचे १ अधिकारी ३५ जवानांनी एकत्रित येत रूट मार्च काढला. तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वर्दळीच्या ठिकाणी कोपरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एसएसटी पॉईंट, झगडे फाटा पुणतांबा फाटा व टाकळी फाटा येथे सीआरपीएफ जवानांचा नाकाबंदी पॉईंट लावण्यात आला.
सदर रूट मार्च यशस्वी करण्यासाठी सहभागी कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली मुकणे, महेश कुसारे, दिलीप पगार, तालुका पोलीस स्टेशनचे अंमलदार तसेच सीआरपीएफचे कमांडर उदयसिंग यांच्यासह सहभागी ३५ उपस्थित जवानांनी अथक परिश्रम घेतले.