संजीवनी शैक्षणिक संस्था

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ११ अभियंत्यांची लेक्ट्रिक्स ईव्ही मध्ये नोकऱ्यांसाठी निवड-  अमित कोल्हे

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ११ अभियंत्यांची लेक्ट्रिक्स ईव्ही मध्ये नोकऱ्यांसाठी निवड-  अमित कोल्हे


                                चालु शैक्षणिक वर्षाची  दमदार सुरूवात

कोपरगांव विजय कापसे दि ३० ऑक्टोबर २०२४संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड  पी) विभागाच्या प्रयत्नाने लेक्ट्रिक्स इलेक्ट्रिकल व्हेईकल या वाहन उद्योगातील आघाडीच्या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत काही दिवसांपुर्वी संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील  विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. यात या कंपनीने ११ नवोदित अभियंत्यांची आकर्षक  पगारावर निवड केली आहे. संजीवनी इंजिनिअंरीग कॉलेजला ऑटोनॉमस दर्जा असल्यामुळे दरवर्षी  आपल्या विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवुन देण्यासाठी अग्रेंसर असते, या वर्षीही  ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंटची दमदार सुरूवात झाली आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

जाहिरात

           पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना  त्यांच्या शाखा निहाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या  मिळवुन देण्यासाठी टी अँड  पी विभाग सातत्याने प्रयतन करीत असतो. तसेच कंपन्यांच्या गरजेनुसार अधिकचे प्रशिक्षणही देत असतो. याचा परीणाम म्हणुन काही दिवसांपुर्वी लेक्ट्रिक्स कंपनीने मुलाखतींचे आयोजन केले होते. या मुलाखातींचा निकाल दिवाळीच्या तोंडावर जाहिर झाला असुन निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दिवाळीची भेट दिली आहे. यात ओम सुरेश  बागुल, जागृती प्रदिप भास्कर, धनेश  आण्णासाहेब लवांडे, सायली अरूण जाधव, पंकज संजय चांदर, किरण राजु चव्हाण, अनिकेत गोरक्षनाथ सोणवने, श्वेता  संजय आहेर, तेजश्री कैलास काळे, शंकर  आनंदा मानुरकर व अलंकार अनिल राडे यांचा समावेश  आहे.

जाहिरात

            चालु वर्षीच्या  अंतिम वर्षातील  या दमदार निवडीबध्दल संजीवनीचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांनी समाधान व्यक्त करून सर्व नवोदित अभियंत्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी डायरेक्टर डॉ. ए.जी. ठाकुर व विभाग प्रमुख उपस्थित होते.

जाहिरात

 

 

     संजीवनीमधुन विविध स्पर्धा परीक्षांची तयार करून घेतली जाते तसेच विविध नामांकित कंपन्यांमध्ये  नोकरी मिळण्यासाठी भरपुर तयारी करून घेतल्या जाते, याची मला व माझ्या वडीलांना माहित होते, म्हणुनच मी येथे प्रवेश  घेतला. कंपनी मुलाखतींना येण्याच्या अगोदर टी अँड  पी विभागाने आमच्याकडून मुलाखतींचा भरपुर सराव करून घेतला. तसेच कंपनीच्या उत्पादनानुसार कंपनीला कोणते ज्ञान अपेक्षित असेल, या अंदाजाने आमच्याकडून तशी  तयारी करून घेतली. टी अँड  पी विभागा मार्फत दुसऱ्या वर्षापासूनच  मुलाखतींचे तंत्र शिकविल्या जाते, त्यामुळे लेक्ट्रिक्स ईव्ही कंपनीच्या प्रतिनिधिंनी घेतलेल्या मुलाखतींना मी सहज सामोरे जावु शकले, आणि माझी सर्विस इंजिनिअर म्हणुन निवड झाली.-सायली जाधव, विद्यार्थीनी.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे