न्यू इंग्लिश स्कूल, येसगाव येथे AI लॅबचे उद्घाटन व वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न
न्यू इंग्लिश स्कूल, येसगाव येथे AI लॅबचे उद्घाटन व वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि ४ फेब्रुवारी २०२६– कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल येथे सन २०२५–२६ चा वार्षिक पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा तसेच विद्यालयात नव्याने उभारण्यात आलेल्या AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) लॅबचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते तसेच संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा व मॅनेजिंग ट्रस्टी, संजीवनी इंग्लिश मिडियम स्कूल च्या रेणुका विवेक कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी मोठ्या उत्साहात पार पडला.
जाहिरात
कार्यक्रमाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व विद्यालयाच्या कार्याचे अभिनंदन करून सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देत AI लॅबसारख्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीही आधुनिक तंत्रज्ञानात प्रावीण्य मिळवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक व कौशल्याधिष्ठित शिक्षण मिळावे, या उद्देशाने ही लॅब अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.जाहिरात
या प्रसंगी सरपंच पुंडलिक गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य कपिल सुराळकर, ॲड. उत्तमराव पाईक, दगडूतात्या दरेकर, बाबासाहेब म्हस्के, शंकरराव पाईक, माजी सरपंच नंदिनीताई सुराळकर, माजी सरपंच सचिन गायकवाड, अतुल सुराळकर, किरण गायकवाड, डॉ. सुयोग भंडारी, ह.भ.प. सागर महाराज चव्हाण, किरण सुराळकर, पर्यवेक्षिका जयश्री आंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.जाहिरात
यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, नाट्यछटा, समूहगीत तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सर्व स्तरातून विद्यार्थ्यांच्या कला व गुणांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल देवस्थळे, नंदा बढे व रामदास गायकवाड यांनी केले. आभार प्रदर्शन योगेश कदम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवाजी भुतांबरे व गंगाधर घोरपडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, पालक, माता-पालक संघाचे सदस्य व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षिका आंबरे जे. ई., मुख्याध्यापक ठाकरे आर. एम., शालेय समिती, पालक-शिक्षक संघ, माता-पालक संघ, माजी विद्यार्थी संघ व सर्व सेवकवृंद यांनी सहकार्य केले. AI लॅब उभारणीसाठी कलाशिक्षक दीपक खालकर, संगणक शिक्षक कृष्णा गायकवाड व AI विभाग प्रमुख भिका बागुल यांनी विशेष परिश्रम घेतले.