आपला जिल्हा

थोरात कारखान्याकडून दीपावली निमित्त २२ कोटी ११ लाख रुपये बँकेत वर्ग

थोरात कारखान्याकडून दीपावली निमित्त २२ कोटी ११ लाख रुपये बँकेत वर्ग
थोरात कारखान्याकडून दीपावली निमित्त २२ कोटी ११ लाख रुपये बँकेत वर्ग
जाहिरात

Sangmner vijay kapse दि ४ नोव्हेंबर २०२६– काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा राज्याचे माजी महसूल व कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. यावर्षी दीपावलीच्या निमित्ताने 22 कोटी 11 लाख रुपये बँकेत वर्ग केले असल्याने संगमनेरच्या बाजारपेठेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे.

जाहिरात
याबाबत अधिक माहिती देताना कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेरच्या सहकाराची आणि कारखान्याची वाटचाल सुरू आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक, सर्वसामान्य नागरिक कामगार यांचे हित जोपासले आहे. दीपावलीच्या निमित्ताने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना 200 रुपये प्रति टन अनुदान दिले आहे तर कामगारांना 20% बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले आहे. दीपावलीच्या निमित्ताने अमृत उद्योग समूह, कारखाना व विविध संस्थांच्या माध्यमातून बाजारपेठेमध्ये पैसे येतात त्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत असते.

जाहिरात

दीपावलीच्या निमित्ताने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे अनुदान, शेअर्स ठेवींवरील व्याज, दीपावली साखर,पेमेंट या माध्यमातून 12 कोटी 11 लाख रुपये तर कामगारांचा बोनस 10 कोटी असे 22 कोटी 11 लाख रुपये बँकेत वर्ग करण्यात आले आहे. यामुळे संगमनेरच्या बाजारपेठेमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होणार आहे.

दरवर्षी इतर शहरांच्या तुलनेमध्ये संगमनेर मध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी असते विश्वसनीय बाजारपेठ म्हणून संगमनेरची ओळख आहे. अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जातात आणि तेच पैसे पुन्हा बाजारपेठेत येतात. त्यामुळे व्यापाराचे चक्र फिरते आणि आर्थिक उलाढाल होते.

कारखान्याबरोबरच इतर सहकारी संस्थाही पगार व इतर देणे बँकेत वर्ग करणार असल्याने दिवाळीच्या तालुक्यातील शेतकरी,नागरिक,युवक,व्यापारी यांच्यामध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीला शेतकऱ्यांसाठी पेमेंट वर्ग केल्याने शेतकरी,व्यापारी,उत्पादक व कामगार यांनी कारखान्याचे मार्गदर्शक लोकनेते बाळासाहेब थोरात सर्व संचालक मंडळ कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचे अभिनंदन केले आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व अमृत उद्योग समूहातील सर्व संस्थांनी कायम शेतकरी सभासद सर्वसामान्य नागरिक महिला व युवक यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम केले असून दिवाळीच्या निमित्ताने ही रक्कम बँकेत वर्ग केली आहे. यामुळे बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होणार असल्याने व्यापाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी म्हटले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे