आपला जिल्हा
कोपरगाव तालुक्यात मोफत ब्युटी पार्लर कोर्सचे आयोजन- जयश्री रोहमारे
कोपरगाव तालुक्यात मोफत ब्युटी पार्लर कोर्सचे आयोजन- जयश्री रोहमारे
मिळणार शासनाचे प्रमाणपत्र
कोपरगाव विजय कापसे दि १३ सप्टेंबर २०२४– महिला मुलींना अल्पावधीतच स्वतःच्या पायावर उभे राहता यावे या करिता लवकरच कोपरगाव तालुक्यात ब्युटी पार्लर क्षेत्रात करीयर करू पाहणाऱ्या महिला व मुलींसाठी मोफत शासनमान्य ब्युटीपार्लर प्रशिक्षणाचे अयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य आयोजक जयश्री रोहमारे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासनाचे जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर व महाराष्ट्र उद्योजकता विकास मंडळ व ताराराणी मल्टी ट्रेड कंपनी यांच्यामार्फत एक महिन्याचा संपूर्ण ब्युटी पार्लर कोर्स अगदी मोफत कोपरगाव शहर व तालुक्यातील पार्लर क्षेत्रात करीयर करू इच्छिणाऱ्या मुली महिलांसाठी आयोजित केला असून जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ताराराणी कंपनीच्या संचालिका जयश्री रोहमारे याजी केले आहे.
ताराराणी मल्टीट्रेड सर्विसेस या कंपनी मार्फत आयोजित केलेला सदरचा कोर्स पूर्ण करणाऱ्या महिला मुलींना महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र तसेच स्वतःचा स्वयंरोजगार उभा करण्यासाठी शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ३५ टक्के सबसिडीच कर्ज मिळवण्यासाठी सर्व प्रकारचे मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती या प्रसंगी संचालिका रोहमारे यांनी सांगत इच्छुक महिला मुलींनी ९०११४४७१९० व ८८८८४२९१७१ या नंबर वर संपर्क साधावा.