संगमनेर

थोरात कारखान्याकडून ऊस वाढीसाठी विविध ऊस अनुदानित विकास योजना

थोरात कारखान्याकडून ऊस वाढीसाठी विविध ऊस अनुदानित विकास योजना
थोरात कारखान्याकडून ऊस वाढीसाठी विविध ऊस अनुदानित विकास योजना
संगमनेर प्रतिनिधी दि १३ सप्टेंबर २0२४सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्रात या वर्षी चांगला पाऊस झालेला असून सर्व धरणे भरलेली आहेत. काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमुळे निळवंडे कालव्यांचे पाणीही कार्यक्षेत्रातील बऱ्याच गावांमध्ये उपलब्ध झालेले आहे. कारखान्याने कायम उच्यांकी भावाबरोबर शेतकरी सभासद व कामगारांचे हित जोपासले आहे. कार्यक्षेत्रातून सन २०२५ – २६ चा गळीत हंगामात ऊस लागवड, खोडवा / निडवा पिक घेणाऱ्या ऊस उत्पादकांसाठी आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे संचालक मंडळाने विविध अनुदानित ऊस विकास योजना सुरु करण्यात आल्याची माहिती चेअरमन प्रतापराव उर्फ बाबा ओहोळ यांनी दिली आहे.

जाहिरात
ऊस उत्पादन वाढ कार्यक्रमांतर्गत माहिती देताना ते म्हणाले की, कार्यक्षेत्रातील गावांमध्ये नवीन ऊस लागवडीसाठी प्रती एकरी ५५०० ऊस रोपे ( ४ x २ फुट सरीमध्ये ) प्रती रोप रुपये १.७० पैसे या अनुदानित दराने शेतकऱ्यांचे बांधावर पोहोच केले जाणार आहेत. तसेच स्वतः ऊस रोपे तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती एकरी १५० प्लास्टिक ट्रे व २० गोण कोकोपीट ५०% अनुदानावर वसुलीचे अटीवर दिले जाईल. जे शेतकरी सुपर केन नर्सरी द्वारे ऊस रोपे तयार करणार असतील त्यांना कारखान्यामार्फत मार्गदर्शन व एकरी रूपये १५००/ प्रमाणे अनुदान दिले मिळेल. जे शेतकरी प्रमाणित बेणे प्लॉट मधील बेणे ऊस लागवडीसाठी विकत घेऊन वापरतील त्यांना बेणे रक्कम म्हणून रु १०,००० / प्रती एकरी वसुलीचे अटीवर दिले जाते.

जाहिरात

हिरवळीचे पिकांमुळे जमिनीचा पोतसुधारत असल्याने जे शेतकरी कारखान्याकडून ताग व धैंचा बियाणे घेऊन हिरवळीचे पिक घेतलेनंतर त्या क्षेत्रात ऊस लागवड करतील त्यांना त्यांचा ऊस गळीतास आलेनंतर निवळीचे खताचे बियाणाची ५०% रक्कम अनुदान म्हणून दिली जाते. राजहंस सेंदीय खत व अमृतशक्ती दाणेदार सेंद्रीय खते (प्रोम फटीलाझर) तसेच बायो फटीलाझर वापरणे गरजेचे आहेत. २०२५ – २६ गळीताचे ऊसासाठी ऊस उत्पादकांना ५०% अनुदानावर वसुलीचे अटीवर प्रती एकरी १ मे टन अमृतशक्ती दाणेदार सेंद्रिय खत देण्यात येते. कार्यक्षम पाणी वापर करून प्रती हेक्टरी ती जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणेसाठी कारखान्याने ४००० मीटर नॉन आय एस आय पेप्सी लॅटरल ५०% अनुदानावर वसुलीचे अटीवर देण्याचे धोरण घेतलेले आहे.

जाहिरात

वेळोवेळी ऊस पिकावर येणाऱ्या रोग व किडींचे बंदोबस्त करण्यासाठी कारखान्यामार्फत किटकनाशके व बुरशीनाशके उपलब्ध करून दिली जातात. तसेच बेणे घुटी करणेसाठी बड कटर मशीन, पाचट कुटीसाठी मल्चर मशीन, डिक्सप्लाऊ, बुडखे छाटणी मशीन, सब सॉयलर नांगर इ.अवजारे नाम मात्र भाडे आकारून ऊस उत्पादकांना उपलब्ध करून दिली जातात. याच बरोबर २०२४ – २५ या हंगामातील लागवडीचा ऊस तुटलेनंतर शेतक-यांनी उसाचा शास्रोक्त पद्धतीने खोडवा, निडवा ठेवणे गरजेचे आहे. या करिता कारखान्याचे शेतकी व ऊस विकास विभागाचे वतीने शेतक- यांना विशेष मार्गदर्शन केले जात आहे.

थोरात कारखाना

या बाबतच्या आधिक माहितीकरिता ऊस उत्पादकांनी कारखान्याचे विभागीय गट कार्यालय किवा ऊस विकास विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन संतोष हासे व सर्व संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व शेतकी विभागाने केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे