आपला जिल्हा

कला शिक्षक निर्मळ यांनी रेखाटला अक्षर गणेश

कला शिक्षक निर्मळ यांनी रेखाटला अक्षर गणेश
 अक्षरांना गणेशाची रूप देणारा किमयागार कलाकार
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १३ सप्टेंबर २०२४गणेश उत्सव देशभरात उत्साहाने साजरा केला जात आहे. प्रत्येक जण गणेशोत्सव पर्यावरण पूरक व्हावा प्लास्टर ऑफ पॅरिस मुळे होणारे जल प्रदूषण कमी व्हावे म्हणून शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण पूरक गोष्टीचा वापर करून गणपती बनविणे अथवा कागदावर चित्र रेखाटून गणरायाची आराधना करून काही नागरिक हा उत्सव इको फ्रेंडली बनवत आहे.

जाहिरात

       रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. सी एम मेहता कन्या विद्या मंदिर कोपरगाव येथील कलाध्यापक अमोल बाळासाहेब निर्मळ यांनी कागदावर अक्षरगणेश रेखाटून गणरायाची आराधना केली आहे. गणेशाची विविध रूपे घेऊन त्यास अक्षरशिल्पाचे रूप दिले आहे. विद्यालयात विद्यार्थ्यांचे अक्षर सुधारावे यासाठी त्यांनी सुंदर हस्ताक्षर प्रकल्प राबविला त्यातूनच त्यांना अक्षरगणेशाची संकल्पना सुचली विद्यार्थ्यांना त्यांच्या नावातूनच गणपती साकारण्यामुळे त्यांना आवड निर्माण झाली . आपल्याच नावात गणेश साकारल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा असतो.विद्यार्थीही विविध शब्दांचा वापर करत अक्षर गणेश रेखाटतात हे रेखाटन आपल्या जवळील व्यक्तीस भेट देतात तसेच ते विद्यार्थ्यांकडून शाडू माती पासून गणपती तयार करून घेतात अशा अनेक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो व कलेची आवड निर्माण होते. तसेच ते इतर अनेक विद्यालयात जाऊन शाडू माती पासून गणपती बनवा कार्यशाळा घेतात व जनजागृती करतात.

जाहिरात
        निर्मळ यांना या कामी कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे.त्यांनी राबविलेल्या सामाजिक विषयावर त्यांनी अनेक चित्रे रेखाटून जनजागृती केलेली आहे.त्यांच्या आशा उपक्रमा बद्दल प्रत्येक स्थरातून अभिनंदन होत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे