डॉ सुभाष मुंदडा यांचा अमृत महोत्सव विशेष
डॉ सुभाष मुंदडा यांचा अमृत महोत्सव विशेष
कोपरगावातील जुन्या काळातील सुप्रसिद्ध डॉ.सुभाषजी मुंदडा यांचा आज ७५ वा म्हणजे अमृत महोत्सव हार्दिक अभिनंदन परमेश्वर तुम्हाला उदंड व निरोगी आयुष्य देवो
कोपरगाव विजय कापसे दि ३० डिसेंबर २०२४– डॉ.सुभाषजी मुंदडा हे बी.जे मेडिकल मधून एम.बी.बी.एस ची पदवी घेऊन डॉक्टर झाले त्यांनी डॉक्टर हा सेवा आहे व्यवसाय नाही असं समजून काम केले. डॉ.सुभाष जी मुंदडा कोपरगावातील प्रसिद्ध भूलतज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे. कोपरगावातील मुंदडा परिवार म्हणजे एक संस्कार क्षम व वैभवशाली परिवार समजला जातो.
श्री.रामविलासशेठ मुंदडा यांचे चिरंजीव शेखर मुंदडा हे महाराष्ट्र शासनात राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले गो सेवा मंडळाचे अध्यक्ष आहे संपूर्ण महाराष्ट्रात म्हणून प्रसिद्ध आहे. डॉ.सुभाषजी मुंदडा यांना सत्येन व सचिन ही दोन मुल डॉ.सुभाष मुंदडा हे दहा वर्ष नगरसेवक होते मर्चंट बँकेचे माजी चेअरमन होते लायस क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष होते. डॉक्टर सुभाषजी मुंदडा यांचे चिरंजीव सत्येन कोपरगाव नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांनी कोपरगावात नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
डॉक्टर सुभाष मुंदडा अशी प्रचंड कामगिरी असताना सुद्धा डॉक्टर त्यांच्या आयुष्यात अत्यंत साधे-सुधे राहिले. प्रॅक्टिस बंद केल्यानंतर माहेश्वरी समाजातील असो अथवा सामान्य नागरिक असो मेडिकलचा सल्ला घेण्यास आल्यास ते आनंदाने त्यांना मार्गदर्शन करत गुजरात मध्ये भूकंप झाला तेव्हा त्यांनी पंधरा दिवस पिडीताना आरोग्य सेवा दिली तसेच मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरामध्ये त्यांचा मोठा सहभाग असे.
डॉ.सुभाष मुंदडा यांच्या धर्मपत्नी कोपरगावातील सर्व धार्मिक कार्यक्रमात अग्रेसर असतात डॉ.सुभाष मुंदडा यांचे मोठे बंधू रामविलासशेठ, धाकटे बंधू डॉ.कांतीलाल व प्रकाश हे सर्व कुटुंब समाजसेवेस वाहून घेतले आहे आशा डॉ.सुभाष यांचा आज ७५ वा वाढदिवस साजरा करताना कोपरगावकरांना नक्कीच आनंद अभिमान वाटत आहे. पुनच्छ एकदा डॉक्टरांना अभिष्टचिंतन.
शुभेच्छा- नारायण शेठ अग्रवाल कोपरगाव.