आपला जिल्हा

नवचैतन्य हास्ययोग् परिवार आयोजित अवयवदान कार्यशाळा  संपन्न

नवचैतन्य हास्ययोग् परिवार आयोजित अवयवदान कार्यशाळा  संपन्न

अवयव दान हेच सर्व श्रेष्ठ दान
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १७ सप्टेंबर २०२४कोपरगाव येथील बजाज कोचिंग क्लास येथे नुकतीच अवयवदान कार्यशाळा पार पडली या कार्य शाळेला प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते व अवयवदान समुपदेशन डॉ अशोक गावित्रे यांनी मार्गदर्शन केले. डॉ गावित्रे हे फेडरेशन ऑफ बॉडी अँड ऑर्गन डोनेशन व मोहन फाउंडेशन च्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून प्रबोधन करत असुन त्यांच्याच प्रयत्नतुन शिर्डी सस्थान येथे लवकरच आय  बँक सुरु  होत आहे. या प्रसंगी त्यांनी अवयवदानाची संपुर्ण प्रक्रिया त्यासाठी लागणारे फॉर्म कसे व कुठे भरावे ,अवयवदानाची देश ,राज्य ,जिल्हा पातळीवर याची आकडेवारी तसेच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आपण कसा कमी करू शकतो या संदर्भातील अंधश्रद्धा याबद्दल संपूर्ण माहिती दिली तसेच उपस्थिताच्या संपूर्ण शंकाचे निरसन केले तसेच मानवी देहाची माती किव्हा राख होण्यापेक्षा त्याचा इतराना उपयोग व्हावा मृत्यू नंतर देखील जीवंत कस रहावं याबद्दल प्रबोधन केले.

जाहिरात

तसेच या अवयवदानाच्या चळवळीत प्रत्येकांनी सहभागी होण्याच आवाहन त्यांनी केले.  तसेच NOTTO, ROTTO, SOTTO, ZTCC या कस काम करतात ,प्रतीक्षा यादी कशी तयार केली जाते  याबद्दल सविस्तर माहिती दिली.तर उपस्थित असलेले सुप्रसिद्ध लेखक व निवेदक सुहासभाई मुळे यांनी देखील ज्ञानेद्रिय व कर्मेंद्रिय याविषयी सखोल माहिती दिली.

जाहिरात
याप्रसंगी गोदावरी खोरे तालुका दुध उत्पादक संघाचे चेअरमन  राजेशआबा परजणे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेसाठी सी आर बजाज व राहुल बजाज यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच या प्रसंगी नाईक सर, घाटे साहेब, जोगनपुत्र देशपांडे, शिवकाल भंडारी, अमृतकर सर, सुशीला बजाज आदी मान्यवर उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे