संदीप वर्पे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी

दिंडोरीचे खासदार भगरे सरांची ॲड. संदीप वर्पे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट 

दिंडोरीचे खासदार भगरे सरांची ॲड. संदीप वर्पे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट 

दिंडोरीचे खासदार भगरे सरांची ॲड. संदीप वर्पे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १७ सप्टेंबर २०२४माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांचे अत्यंत विश्वासू व खंदे समर्थक म्हणून राज्यभरात परिचित असलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश पप्रवक्ते तथा अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष ॲड.संदीप वर्पे यांच्या कोपरगाव येथील ‘पसायदान’ या निवासस्थानी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्करराव भगरे सर यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली आहे.

जाहिरात

 गेल्या लोकसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा निवडणुकीत खासदार भास्करराव भगरे सर यांनी भाजपच्या केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत संपूर्ण देशभरात चर्चेला गेले होते. त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त कोपरगाव येथून जात असताना त्यांनी ॲड.संदीप वर्पे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत वर्पे यांच्या घरी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

जाहिरात

 याप्रसंगी महाविकास आघाडीचे पुरुषोत्तम पडियार, रंजन जाधव, संतोष वढणे, समीर वर्पे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे कोपरगाव शहर अध्यक्ष स्वप्निल पवार, सोशल मीडिया प्रमुख ऋतुराज काळे आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गाडी चालवताना खा.भगरे सर

 याप्रसंगी ॲड.संदीप वर्पे यांनी बोलताना सांगितले की, मी खासदार भगरे सरांना येवला नाका येथे घ्यायला गेलो असता त्यांनी स्वतः गाडी चालवत मला शेजारी बसून मलाच माझ्या घरी घेऊन आले असे कुठलाही बडेजाव नसलेले सामान्य व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित असलेले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या पारखी नजरेने व परिस स्पर्शाने निवडलेल्या नवरत्नांपैकी एक हिरा म्हणून खासदार भास्करराव भगरे सर असल्याचे मत ॲड.संदीप वर्पे  यांनी व्यक्त करत खासदार भगरे यांचा येथीचीत सन्मान करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

उपस्थित महाविकासआघाडीचे पदाधिकारी
ॲड.संदीप वर्पे हे उगवते  युवा नेतृत्व असून ते अत्यंत अभ्यासू, विचारवंत व खासदार शरदचंद्र पवार यांचे विश्वासू खंदे समर्थक म्हणून संपूर्ण राज्याला परिचित असून भविष्यात त्यांना नक्कीच राज्याच्या राजकारणात मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळेल.
खासदार भास्करराव भगरे
ॲड. संदीप वर्पे यांच्या कुटीबीयांच्या वतीने सन्मान

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे