अहमदनगर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी सोपान धेनक
अहमदनगर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी सोपान धेनक
चासनळी येथील रहिवाशी
कोपरगाव विजय कापसे दि १७ सप्टेंबर २०२४– कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील मा.महसूल मंत्री, जलनायक बाळासाहेब थोरात यांचे कायम विश्वासू राहिलेले सोपान धेनक यांची अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे व अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी यादव यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी कोपरगाव तालुका काँग्रेसमध्ये असताना चांगले काम केलेले असून.त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना जिल्हा कमिटीवर जिल्हा उपाध्यक्ष पदी घेऊन परत एकदा जिल्हाध्यक्ष बंटी यादव यांनी त्यांना काम करण्याची संधी दिलेले आहे.
धेनक यांचे माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, संगमनेर युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयश्रीताई थोरात, कोपरगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आकाश नागरे, युवक काँग्रेसचे तुषार पोटे, कोपरगाव काँग्रेसचे रवींद्र साबळे, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ पगारे, जिल्हा कार्याध्यक्ष अरुण गावित्रे, आदींनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.