आपला जिल्हा

उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच युवासेनेची मानाची दहिहंडी उत्साहात साजरी 

उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच युवासेनेची मानाची दहिहंडी उत्साहात साजरी 
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच युवासेनेची मानाची दहिहंडी उत्साहात साजरी 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १९ ऑगस्ट २०२५–  कोपरगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना शहरप्रमुख पैलवान गननभैय्या अनिल हाडा यांच्या अध्यक्षतेखाली हजारो युवाकांच्या सहकार्याने कोपरगाव शहरात प्रथमच मानाची दहिहंडी चे नियोजन करून दहिहंडी उत्साहात साजरी करण्यात आली.

जाहिरात
छत्रपती संभाजी नगरची प्रसिद्ध रिलस्टार वैदही मुंढे हि दहिहंडीचे प्रमुख आकर्षण होती. शहरातील विविध पक्ष संघटनेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शुभेच्छापुर्वक भेटी दिल्या. तालुक्यातील अनेक गोविंदा पथकांनी दहिहंडी फोडण्यासाठी सहभाग नोंदविला. यावेळी प्रचंड गर्दी दहिहंडी फोडण्यासाठी रचलेला मानवी थरांचा थरार पाहण्यासाठी उसळली होती. आवाज कुणाचा शिवसेनेचा,जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून गोविंदा पथकांना लोकांमधून प्रतिसाद मिळताना दिसत होतो.लोकांनी पुढच्या वर्षी यापेक्षा अजून उत्साहात दहिहंडी उत्सव साजरा करा अशी अपेक्षा व्यक्त केली.

जाहिरात
   कोपरगाव शिवसेना नेते अस्लमभाई शेख, भरत मोरे, मुन्नाभाई मन्सुरी यांनी दहिहंडी उत्सव साजरा करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.भरत मोरे यांनी सुत्रसंचलन आणि उपस्थित गोंविदांचे व गोंविदा पथकाचे स्वागत केले.युवासेना शहरप्रमुख पैलवान गननभैय्या हाडा यांनी दहिहंडी उत्सव संपन्न झाल्यावर नागरिकांचे आणि पोलिस प्रशासनाचे,रूग्णवाहीका कर्मचारी या सर्वांचे आभार मानले.

जाहिरात
तर कान्हा हाडा, वैभव शेलार,राहुल हाडा, निखिल कंक्राळे,चेतन हाडा, पीयूष सैंदाने, दीक्षांत साबळे, विनय टाक, सोनू नीरभवने, साहिल पटवेकर, स्वप्नील नीरभवने, दिनेश मरसाळे, सोहेल पठाण, करण पाटोळे, रितेश वाघिले, आकाश कानडे, रियान शेख, लोकेश हाडा, गणेश भासाळे, इमरान शेख, आकाश पाठक, याकूब शेख, आसीम शेख, मंगेश रघुवंशी, संदीप हाडा, शक्ती हाडा, अतुल बारहाते, वरून टाक, शहाबाज शहा, देवराज हाडा, समीर पटवेकर, यश हाडा, सुमित राखपसरे, गणेश वहाडने, आशू शेख, विनीत हाडा, युवराज हाडा, मुकेश वाणी आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे